मुंबई: ‘उद्धव ठाकरे म्हणतात पोलीस भाजपला विकले आहेत. आम्ही पोलिसांबद्दल एकही अपशब्द खपवून घेणार नाही, गाठ आमच्याशी आहे. खरंच वाघ असाल तर 'मातोश्री'ची सर्व पोलीस सुरक्षा काढा आणि माझ्यासारखं एकटं फिरून दाखवा, असं शब्दात सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

‘उद्धव ठाकरेंनी आमच्यासारखं एकट्यानं फिरुन दाखवावं’

‘उद्धव ठाकरे म्हणतात पोलीस भाजपला विकले गेले आहेत, जाऊन भांडी घासा.’ पोलिसांबद्दल एक शब्द जरी काढला तर गाठ आमच्याशी आहे. उद्धव ठाकरे जर खरच वाघ असतील तर ‘मातोश्री’चे सर्व पोलीस काढा, मी आणि विद्याताई जसे एकटं फिरतो तसं महाराष्ट्रात फिरून दाखवा. उद्धव एका पोलिसाशिवाय बाहेर जात नाही. त्यांना 40 पोलीस लागतात आणि त्याच पोलिसांना नाव ठेवता? मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला ताकीद देते पोलिसांना काय बोलतात तर याद राखा.’ अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

‘मुख्यमंत्री रोज गुंडांच्या मांडीला मांडी लावून फोटो काढतात’

उद्धव ठाकरेंसोबतच सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांवरही शरसंधान साधलं. ‘रोज गुंडाच्या मांडीला मांडी लावून फोटो काढतात. मुख्यमंत्र्याना लाज वाटली पाहिजे. पुण्यात एक मशीन आणलं आहे मुख्यमंत्र्यांनी, इकडून गुंड घातला कि मुख्यमंत्री गृहखात्याची पावडर टाकतात. मग बाहेर येतो एक सुसंस्कृत माणूस. आमच्या पुण्यात एक शेलार आहे. मुख्यमंत्र्यांनी विचारले, काय करतोस रे बाबा? तो बोलला ‘तडीपार आहे, पाच खून केले आहेत’, मुख्यमंत्री म्हणतात, ‘ये रे बाबा, मशीनमध्ये टाकलं गृहखात्याची पावडर टाकली आणि बाहेर आले माननीय शेलार, मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी काढला झालं. अशी जोरदार टीका सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांवर केली.’

‘ही लोकं एकमेकांचे पाणी काढतात, ही काय संस्कृती आहे?’

‘सिरीयलवाले कमी भांडतात पण हे शिवसेना-भाजप त्यांच्यापेक्षा जास्त भांडतात. उद्धव ठाकरे म्हणतात, फडणवीसांच्या डोक्यात खड्डे झाले आहेत. तर मुख्यमंत्री म्हणतात. ‘खड्ड्यात रस्ते की, रस्त्यात खड्डे कळत नाही?’ तर दुसरीकडे ही लोकं एकमेकांचे पाणी काढतात. ही काय संस्कृती आहे का?’ असं म्हणत सुप्रिया सुळेंनी शिवसेना-भाजपवर टीका केली.

संबंधित बातम्या:

‘सामना’ला नख लावला तर महाराष्ट्र पेटून उठेल: उद्धव ठाकरे

'सामना'वर बंदीची मागणी ही लोकशाहीची हत्या : नवाब मलिक

हर्षवर्धन पाटील भाजपात येणार होते, तावडेंचा गौप्यस्फोट

...म्हणून मला मुख्यमंत्र्यांची कीव येते: शिवसेना खासदार