मुंबई : शनिवारी सकाळी सात वाजताच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून एका तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

अक्षय सारस्वत असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेश गाजियाबादचा रहिवासी होता. त्याची मानसिक स्थिती बरी नसल्याने गेले तीन दिवस तो राहत्या घरातून निघून गेला होता.

त्याच्या घरचे त्याचा शोध घेत होते. उच्चशिक्षित असलेला अक्षयने शनिवारी त्याच्या नातेवाईकांना विमानतळावर फोन करून बोलावले आणि त्यांच्या समक्ष इमारतींवरून उडी घेऊन आत्महत्या केली. आपल्या मृत्यूला कोणासही कारणीभूत ठरवू नये अशी त्याने चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती.