नवी मुंबई: नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये विद्यार्थिनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्राचार्यांवर गुन्हा दाखल केला गेला आहे. त्याप्रकरणी सुधागड कॉलेजचे प्राचार्य इकबाल इनामदार यांना अटक करण्यात आली आहे.


 

अकरावी प्रवेशासंदर्भात फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आत्महत्या केलेल्या पुष्पा सूर्यवंशीनं अकरावीसाठी ऑफलाईनद्वारे 20 हजार भरले होते. पण ऐनवेळी प्रवेश रद्द केल्यानं नैराश्य आलेल्या पुष्पानं आत्महत्या केली.

 

ऑनलाईन प्रवेशामुळे शिक्षण संस्थांची दुकानदारी ठप्प झाली आहे. त्यातून पळवाट काढण्यासाठी अशा संस्था ऑफलाईन तंत्राचा वापर करतात.

 

संबंधित बातम्या:

 

आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्यानं तरुणीची आत्महत्या