मुंबई : आयआयटीमधील विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या विविध कंपन्यांकडून पहिल्याचं दिवशी भरघोस पॅकेजेस मिळाले आहेत. यावर्षी 25 लाखापेक्षा जास्त पॅकेज मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त असल्याची माहिती मिळाली आहे.
आयआयटी मुंबई प्लेसमेंटच्या पहिल्या दिवशी सर्वात जास्त पॅकेज मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून 1.14 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले असून NEC जपान कंपनीने 27.95 लाख रुपये पॅकेज दिले आहेत. तर डोमेस्टिक कंपनीकडून सर्वात जास्त ब्लेकस्टोन कंपनीकडून 45 लाख रुपये सर्वात अधिक पॅकेज तर वर्ल्ड कॉन्ट कंपनीकडून 42.87 लाख पॅकेज विद्यार्थ्याला मिळाल आहे. पहिल्या दिवशी 21 कंपनी कडून विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली असून आणखी कंपनी पुढील दिवसात येणार असल्याचा आयआयटी मुंबई प्लेसमेंट सेलकडून सांगण्यात आलं आहे.
मागच्या वर्षी पहिल्या दिवशी मायक्रोसॉफ्ट कंपनीने 1.39 कोटी रुपये सर्वात जास्त पॅकेज दिला होता. तर यावर्षी या कंपनीने 1.14 कोटीचे पॅकेज दिले आहे. 1 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत प्लेसमेंट फेज 1 आयआयटी मुंबई मध्ये सुरु झाली आहे.
आतपर्यंत 275 कंपन्या आयआयटी मुंबईमध्ये प्लेसमेंटसाठी आल्या आहेत. यामध्ये जवळपास 800 नोकऱ्यांची संधी विविध कंपन्यामध्ये असणार आहे. यावर्षी जवळपास 1650 विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी रजिस्ट्रेशन केले आहे. यामध्ये 165 विद्यार्थ्यांना प्री प्लेसमेंट ऑफर्स मिळाल्या आहेत. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत प्लेसमेंटचा आकडा जास्त आहे.
यावर्षी सुद्धा अनेक आंतराष्ट्रीय आणि प्रतिष्ठित कंपन्या आयआयटी मुंबई मध्ये प्लेसमेंटसाठी निमंत्रित केल्या आहेत. तर 45 कंपन्या पहिल्यांदाच प्लेसमेंटसाठी आयआयटीमध्ये येणार आहेत.
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी मालामाल, विविध कंपन्यांकडून भरघोस पॅकेज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Dec 2018 11:23 PM (IST)
पहिल्या दिवशी 21 कंपनी कडून विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली असून आणखी कंपनी पुढील दिवसात येणार असल्याचा आयआयटी मुंबई प्लेसमेंट सेलकडून सांगण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -