Stock Market Crash Today: पश्चिम आशियातील युद्धाचे ढग गडद झाल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम उमटू लागले आहेत. याचे तीव्र पडसाद आज भारतीय शेअर बाजारात (Stock Market Crash Today) पाहायला मिळाले. बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स Sensex 1800 अंकांनी कोसळला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या Nifty मध्येही 525 अंकांची मोठी घसरण झाली. सत्रादरम्यान ही घसरण अधिकच वाढली असून, सध्या सेन्सेक्स 2400 हून अधिक, तर निफ्टी 750 हून अधिक अंकांनी खाली व्यापार करत आहे.

Continues below advertisement

जागतिक बाजारात हाहाकार

केवळ भारतच नव्हे, तर संपूर्ण आशियाई आणि जागतिक बाजारांना युद्धाचा मोठा फटका बसला आहे. आशियातील प्रमुख बाजारांची स्थिती खालीलप्रमाणे आहे:

  • Japan Market: 7% घसरण
  • South Korea: 8% घसरण
  • Australia: 4% घसरण
  • Singapore: 3% घसरण

US Market: अमेरिकन बाजारातही मोठ्या घसरणीचे संकेत  

अमेरिकन बाजारातूनही (Wall Street) मोठ्या घसरणीचे संकेत मिळत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Continues below advertisement

कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ

युद्धाच्या तणावामुळे जागतिक स्तरावर इंधनाचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत मागील आठवड्याच्या तुलनेत २० टक्क्यांची मोठी वाढ झाली असून, दर ११४ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. इंधनाचे वाढते दर भारतासारख्या आयातदार देशासाठी महागाई वाढवणारे ठरण्याची शक्यता आहे.

 मोजतबा खामेनी यांची 'सर्वोच्च नेते' म्हणून निवड

दरम्यान, इराणमध्ये अयातुल्ला खामेनींचे पुत्र मोजतबा खामेनी यांची 'सर्वोच्च नेते' म्हणून निवड करण्यात आली असून त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला आहे. मात्र, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. "अमेरिकेच्या मान्यतेशिवाय कोणताही नेता टिकू शकणार नाही," असा पुनरुच्चार ट्रम्प यांनी केल्याने भूराजकीय तणाव अधिकच वाढला आहे.

भारत सरकारची भूमिका: एस. जयशंकर यांचे संसदेत निवेदन

पश्चिम आशियातील या संवेदनशील परिस्थितीवर भारत सरकारचे बारीक लक्ष आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आज संसदेत या विषयावर सरकारची भूमिका मांडणार आहेत. ते सकाळी 11 वाजता राज्यसभेत, तर दुपारी 12 वाजता लोकसभेत पश्चिम आशियातील सद्यस्थिती आणि भारताच्या धोरणाबाबत सविस्तर निवेदन देतील.

इतर महत्वाच्या बातम्या