मुंबई : राज्यममंत्री विजय शिवतारे यांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आज लोकल ट्रेनचा पर्याय निवडला. मंत्रालयातील एका तातडीच्या बैठकीसाठी वेळ वाचवण्याकरता त्यांनी गोरेगाव ते चर्चगेट आणि चर्चगेट ते गोरेगाव असा लोकल प्रवास केला.


शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त विजय शिवतारे आज गोरेगावच्या नेस्को संकुलात सकाळपासूनच उपस्थित होते. मात्र सांगोला तालुक्यातील टेंभू धरणातील पाणी एका बंधाऱ्यात सोडण्याबाबतचा प्रश्न घेऊन ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख मंत्र्यांची भेट घ्यायला मंत्रालयात आले होते.

या बैठकीसाठी शिवतारेंनी दुपारी 1.40 ची चर्चगेट पकडली आणि थेट मंत्रालय गाठलं. बैठक उरकून पुन्हा उद्धव ठाकरेंच्या भाषणासाठी चर्चगेट ते गोरेगाव असा उलटा प्रवास केला.

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सुरु असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे वाहनचालकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, यानिमिताने मंत्र्यांनाही सर्वसामान्यांना कोणत्या त्रासाला सामोरं जावं लागतं, याची प्रचिती आली.

पाहा व्हिडीओ :