कोरोनामुळे निर्माण झालेला धोका, मर्यादित दळणवळण, विद्यार्थ्यांचे या काळात अभ्यासात झालेले नुकसान या सर्वांचा विचार करून एमपीएससी मार्फत येत्या 20 सप्टेंबर रोजी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान धनंजय मुंडे यांनी केली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर JEE, NEET परीक्षा पुढे ढकलण्याची धनंजय मुंडेंची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येत असलेल्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून, परिस्थितीचा व विद्यार्थ्यांचा विचार करून सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
येत्या 20 सप्टेंबर रोजी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा (एमपीएससी) लेखी परीक्षा महाराष्ट्रामध्ये होणार होती. या परीक्षेची तारीख कोरोनामुळे याआधीही बदलण्यात आली आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीतीमध्ये एकीकडे कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना एमपीएससी परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना समूह संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वतयारी, शैक्षणिक साहित्य यांसह इतर बाबींचाही अडचण झालेली आहे, त्यामुळे ही परीक्षा देखील आणखी काही दिवस पुढे ढकलण्यात यावी, असं धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पत्रात म्हटले होते.
जेईई (JEE) व नीट (NEET) पुढे ढकलण्यासाठीही राज्य सरकारने मागणी करावी : धनंजय मुंडे
देशभरातून लाखो विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली इंजिनिअरिंग प्रवेशासाठीची जेईई (JEE) व वैद्यकीय प्रवेशासाठीची (NEET) परीक्षा सध्याच्या परिस्थितीत घेणे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणारे ठरू शकते, या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या दोन्हीही परीक्षा काही महिने पुढे ढकलाव्यात यासाठी राज्य सरकारच्या वतीने आग्रही मागणी करण्यात यावी अशी मागणीही मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे.
JEE-NEET Exam पुढे ढकलण्याची देशभरातून वाढती मागणी