- मृतांच्या वारसांना: राज्य सरकारकडून 5 लाख + रेल्वेकडून 5 लाख = 10 लाख
- गंभीर जखमी: 1 लाख
- किरकोळ जखमी: 50 हजार
- जखमींवरील उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी: कोणाला किती मदत?
एबीपी माझा वेब टीम | 29 Sep 2017 03:38 PM (IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून तर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेकडून मदतीची रक्कम जाहीर केली.
मुंबई: मुंबईतील चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसांना राज्य सरकाने 5 आणि रेल्वेने 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून तर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेकडून मदतीची रक्कम जाहीर केली. याशिवाय गंभीर जखमींना 1 लाख रुपये, किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली. मुख्यमंत्री सध्या नियोजित सिंगापूर दौऱ्यावर, तर रेल्वेमंत्री मुंबई दौऱ्यावर आहेत. कोणाला किती मदत?