Nitesh Rane on CM Uddhav Thackeray : ठाकरे नाव लावून कोणी बाळासाहेब (Balasaheb Thackeray) होत नाही, त्यासाठी रक्तही असावं लागतं, आता तुमचं रक्त तपासण्याची वेळ आणू नका, अशा शब्दात भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Strike) संपात सहभागी होऊन, नितेश राणे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. कितीही एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करा, आता मागे हटणार नाही, आर-पारची लढाई लढू, अशा इशारा यावेळी नितेश राणे यांनी दिला.


एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात राज्य सरकारवर टीका करताना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची पुन्हा एकदा जीभ घसरली. नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांच्या आजारापणावरून टीका केली.  मुख्यमंत्र्यांना उगाच मानेला पट्टा लागला नाही, सोनिया गांधींसमोर वाकून वाकून त्यांच्या मानेला पट्टा लागला असल्याची शेलकी टीका नितेश राणे यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या मानेवर कसलीशी सर्जरी झाली आहे. डॉक्टरांनी निष्कर्ष काढलाय या माणसाला कणा तरी आहे का? मुख्यमंत्र्यांना उगाच मानेला पट्टा लागला नाही, सोनिया गांधीसमोर वाकून वाकून लागला असल्याचे राणे यांनी म्हटले.


आझाद मैदानात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात बोलताना नितेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही टीका केली. मागील आठ वर्षांपासून परिवहन खाते हे शिवसेनेकडे आहे. या कालावधीत तुम्ही काय केले, असा सवाल नितेश राणे यांनी केला. मंत्रालयातील स्वत: च्या कार्यालयात बसून बोलू नये. एकदा आझाद मैदानात या असे आव्हान नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिले. विलीनीकरण झालं तर कर्मचाऱ्यांच हित आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांची दुकानदारी बंद होईल असा दावाही राणे यांनी केला.


नवाब मलिक यांना पाकिस्तानमध्ये हाकला


नवाब मलिक अतिरेक्यांना मदत करणारे देशद्रोही आहेत. त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, इतकंच नव्हे तर त्यांना देशातून हाकलून पाकिस्तानात पाठवा अशी मागणीही नितेश राणे यांनी केली. 


संबंधित वृत्त:


Nitesh Rane on ST workers Strike : सोनिया गांधीसमोर वाकून वाकून मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा; नितेश राणेंची शेलकी टीका


संपकरी एसटी कामगारांवर कारवाई सुरूच; आतापर्यंत 2053 जण निलंबित 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha