Nitesh Rane on CM Uddhav Thackeray ST workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात राज्य सरकारवर टीका करताना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची पुन्हा एकदा जीभ घसरली. नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांच्या आजारापणावरून टीका केली.  मुख्यमंत्र्यांना उगाच मानेला पट्टा लागला नाही, सोनिया गांधींसमोर वाकून वाकून त्यांच्या मानेला पट्टा लागला असल्याची शेलकी टीका नितेश राणे यांनी केली. आझाद मैदानात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात बोलताना नितेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही टीका केली. 


यावेळी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी  एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी एक दिवसाचे विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे. एसटीच्या विलीनीकरणाच्या विधेयकाला आम्ही एकमुखी पाठिंबा देऊ असेही नितेश राणे (Nitesh Rane) यांनी म्हटले. भाजप आंदोलन पेटवत असल्याचा  आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला होता. त्यावर बोलताना राणे यांनी मागील आठ वर्षांपासून शिवसेनेकडेच हे खाते होते याची आठवण करून दिली. हे कर्मचाऱ्यांचेच आंदोलन असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले. कोरोना काळात मुख्यमंत्री घरात बसून होते, त्यावेळी माझा कामगार एसटी घेऊन रस्त्यावर होता असेही नितेश राणे यांनी म्हटले.


मुख्यमंत्र्यावर टीका करताना जीभ घसरली


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे (Nitesh Rane) यांची जीभ घसरली. मुख्यमंत्र्यांच्या मानेवर कसलीशी सर्जरी झाली आहे. डॉक्टरांनी निष्कर्ष काढलाय या माणसाला कणा तरी आहे का? मुख्यमंत्र्यांना उगाच मानेला पट्टा लागला नाही, सोनिया गांधीसमोर वाकून वाकून लागला असल्याचे राणे यांनी म्हटले. नुसतं ठाकरे लावलं म्हणजे बाळासाहेब होता येत नाही. बाळासाहेब कुठे तू कुठे, ठाकरे म्हणजे ठाकरेंचं रक्त येत नाही. रक्ताची चाचणी करण्याची वेळ आणू नको असे नितेश राणे यांनी म्हटले. 


ST Workers Strike Live Updates:लालपरी ठप्प! ST कर्मचाऱ्यांचं आंदोलन अधिक तीव्र, वाचा प्रत्येक अपडेट


अनिल परब यांच्यावर टीका


मागील आठ वर्षांपासून परिवहन खाते हे शिवसेनेकडे आहे. या कालावधीत तुम्ही काय केले, असा सवाल नितेश राणे यांनी केला. मंत्रालयातील स्वत: च्या कार्यालयात बसून बोलू नये. एकदा आझाद मैदानात या असे आव्हान नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिले. विलीनीकरण झालं तर कर्मचाऱ्यांच हित आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांची दुकानदारी बंद होईल असा दावा राणे यांनी केला.  


संबंधित वृत्त:


संपकरी एसटी कामगारांवर कारवाई सुरूच; आतापर्यंत 2053 जण निलंबित


ST Workers Protest : संप चिघळावा यासाठी विरोधकांचे प्रयत्न, कामगार राजकीय बळी ठरले तर दुर्दैवी : अनिल परब