मुंबई :  आज राज्यातील दहावी बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्या परीक्षेमध्ये राज्यात 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. या परीक्षेत मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मात्र घवघवीत यश मिळवले असून यावर्षी मुंबई महापालिकेच्या शाळांचे 97.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हा आतापर्यंतचा सर्वाधिक निकाल जाहीर झाल्याने मुंबई महापालिका शिक्षण विभाग पालिकेच्या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचा आणि  तितकाच उत्साहाचे वातावरण आहे


कोरोना काळ असताना सुद्धा मुंबई महापालिकेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांचं कुठल्याही प्रकारे नुकसान होऊ नये यासाठी विशेष लक्ष प्रशासनाकडून देण्यात आलं होतं. बीएमसीच्या 100 अधिकाऱ्यांना शंभर शाळा या दत्तक देण्यात आल्या होत्या. ज्या ठिकाणी त्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात विशेष लक्ष घातलं आणि त्यांची परीक्षेसाठीची तयारी करून घेतली. सोबतच विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारे शिक्षण मिळावं यासाठी विविध स्तरावर वर्षभर प्रयत्न करण्यात आले आणि विद्यार्थ्यांची परीक्षेसाठीची पुरेपूर तयारी करण्यात आली. 


मुंबई महापालिका शिक्षण विभागाने 'मिशन 35' हा विशेष पॅटर्न बीएमसी शाळांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवला. यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होण्यास संदर्भात विशेष मार्गदर्शन आणि गुरुमंत्र दिला गेला असल्याचं, बीएमसी शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी सांगितलं. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा मिळालेल्या मुंबई महापालिकेच्या शाळांच्या यशाचं अभिनंदन केले. 


2018 साली मुंबई महापालिका शाळांचा दहावीचा निकाल 53 टक्के होता. आता 2019 आली हा सुधारून 93 टक्के पर्यंत आणला आणि यंदाच्या वर्षी हा रेकॉर्डब्रेक निकाल महापालिकेच्या शाळांमध्ये पाहायला मिळतोय. 


मुंबई महानगरपालिका एसएससी मार्च 2022 परीक्षेचा निकाल :



  • एकूण शाळा : 243

  • परीक्षेला प्रवेश झालेले विद्यार्थी : 16807

  • उत्तीर्ण झालेले विद्यार्थी : 16319

  • सरासरी निकाल :- 97.10  %


संबंधित बातम्या



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI