मुंबई : मध्य रेल्वेवर आज शनिवारी कल्याण-कसारा मार्गावर विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. आज मध्यरात्री 2.30 वाजल्यापासून रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. त्यामुळे रविवारी लोकलच्या काही फेऱ्या रद्दही करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेमार्गावरील टिटवाळा आणि आटगाव येथील पुलांसाठीच्या गर्डरचं काम या मेगाब्लॉक दरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळे कसारा आणि टिटवाळा स्थानकांदरम्यानच्या काही फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत.
या मेगाब्लॉकमुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही परिणाम परिणाम होणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात लांब पल्ल्याच्या गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिरानं धावतील.
दरम्यान उद्या रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवर मुलुंड-माटुंगा अप फास्ट लाईनवर सकाळी 11.15 वाजल्यापासून ते दुपारी 4.15 वाजेपर्यंत तर, हार्बर रेल्वेमार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 वाजल्यापासून ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल.
मुंबईत मध्य रेल्वेवर आज विशेष मेगाब्लॉक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Nov 2017 02:37 PM (IST)
मध्य रेल्वेवर आज शनिवारी कल्याण-कसारा मार्गावर विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. आज मध्यरात्री 2.30 वाजल्यापासून रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. त्यामुळे रविवारी लोकलच्या काही फेऱ्या रद्दही करण्यात आल्या आहेत.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -