विमानात आयसिससंबंधी घोषणाबाजी, मुंबई विमानतळावर दोघं ताब्यात
एबीपी माझा वेब टीम | 28 Jul 2016 07:28 AM (IST)
मुंबई: इंडिगो एअरलाईन्सच्या दुबई-कोच्ची विमान आज अचानकपणे मुंबई विमानतळावर उतरवण्यात आलं. विमानातील एका प्रवाशानं आयसिसच्या समर्थनात घोषणाबाजी केली. यामुळे विमानामध्ये चांगलीच घबराट पसरली. यानंतर तातडीनं विमान मुंबईकडे वळवण्यात आलं आणि मुंबई विमानतळावरच त्याचं इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलं. अखेर 9 वाजता मुंबई विमानतळावर विमान लँड झाल्यानंतर त्या प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. विमानात आयसिसच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या व्यक्तीचं नाव वालिया इस्माइल असल्याचं समजतं आहे. याच्या आणखी एका प्रवाशाला विमानातून खाली उतरवण्यात आलं आहे. मात्र, त्याला खाली उतरवण्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, इमिग्रेशनचे अधिकारी त्याची चौकशी करत असून पोलिसांची एक टीम देखील तिथं उपस्थित आहे. हा युवक मानसिकरित्या अस्थिर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.