मुंबई :  मुंबईत  एका सहा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला असून आरे पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. मुंबईच्या आरे कॉलनीतील युनिट क्रमांक 32 भागात राहणाऱ्या 6 वर्षाच्या मुलीवर शेजारीच राहत असलेल्या एका ओळखीच्या 30 वर्षीय व्यक्तीने बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर या मुलीचे अपहरण करुन तिला तिच्या मित्रांकडे नेण्याचा प्रयत्न करण्याचा केला होता. दरम्यान, मुलीचा मोठा भाऊ घटनास्थळी पोहोचला आणि ओरडला त्यामुळे शेजारी राहणारे जमा झाले आणि या आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.


या घटनेनंतर आरे पोलीस या प्रकरणाची दखल घेत आरोपीला अटक केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. पीडित मुलीला जवळच्या ट्रामा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती चांगली आहे. या ठिकाणी भाजपच्या महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबाला भेट दिली. या संदर्भात पोलीस उपायुक्त डी.एस.स्वामी यांची भेट घेऊन आरोपीवर कडक कारवाई करा अशी मागणी केली आहे.



राज्यामध्ये महिलांवर व लहान मुलींवर अत्याचार सातत्याने वाढत चालला आहे. राज्यामध्ये ऑगस्ट महिन्यात 11लहान मुलींवर बलात्कार करण्यात आले. राज्यातील Covid Center मधील विनय भंगाच्या घटना समोर आल्या. आज राज्याला महिला आयोगचा अध्यक्ष नाही. राज्यात 4000 पेक्षा जास्त केस पेंडिंग आहे. महिलांच्या मुद्दयावर हे सरकार किती उदासीन आहे. परंतु राज्यामध्ये जे चाललं आहे त्याच्याकडे कोण बघणार ती जवाबदारी कोण घेणार ? "माझे कुटुंब माझी जबाबदारी" मग आम्ही सगळे बाकीच्या कुटुंबात राहतो का? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.


काल संध्याकाळी 4:30 वाजता आरे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये युनिट क्रमांक 32 मध्ये एक 30 वर्षीय व्यक्तीने सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. आरे पोलिसांनी घटनेची महिती मिळताच कलम 376 च्या अंतर्गत अटक करून पुढील तपास करत आहेत. या वेळी पोलीस उपायुक्त डी.एस स्वामी म्हणाले की, महिला व मुलांच्या काही त्रासाबद्दल कुठल्याही तक्रारी असतील तर लोकांनी डीसीपी, सिनियर पीआय यांच्या नंबरवर कॉल करून माहिती द्यावी त्यांना तात्काळ योग्य ती मदत केली जाईल.