मुंबई : प्रसुती रजेननंतर आता मुलांच्या संगोपनासाठीही महिलांना 180 दिवसांच्या पगारी रजा देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. तसंच बायकोचे निधन झालेल्या पुरुषांनाही मुलांच्या पालनपोषणासाठी 180 दिवसांची पगारी रजा मिळणार आहे.


18 वर्षांच्या आतील मुलं असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येईल. या निर्णयामुळे दहावी किंवा बारावीच्या परीक्षा काळात मुलांसाठी 180 दिवसांनी रजा महिला आणि पुरुष कर्मचारी घेऊ शकतील.

बालसंगोपनासाठी असलेली 180 दिवसांची रजा ही विभागूनही घेता येईल. एका वर्षातून जास्तीत जास्त तीन वेळा ही रजा घेता येईल.

राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय लागू असणार असून, पुढील काही दिवसात शासन निर्णय प्रसिद्ध करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.