मुंबई: मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेने पलटवार केला आहे.


मुंबई भ्रष्टाचारमुक्त करायची असं मुख्यमंत्री म्हणाले असतील, तर त्यांचं स्वागत आहे. मात्र नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे, म्हणजे जर या खात्यात भ्रष्टाचार झाला असेल, तर त्यासाठी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरायचं का? असा सवाल, शिवसेना आमदार अनिल परब यांनी केला.

मुंबई महापालिकेचं बजेट कोट्यवधीचं असूनही शहर पूर्णत: विकसित का नाही, असा सावाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवलं होतं. त्याला शिवसेनेने उत्तर दिलं.

"मुख्यमंत्र्यांकडेच नगरविकास खातं आहे. त्यांना प्रशासकीय कामात शंका वाटत असेल,


तर त्यांनी कारवाई करावी", असं अनिल परब म्हणाले.


स्थायी समितीचे निर्णय एकमतानं झाले आहेत. यात काही घोटाळा वाटत असेल, तर स्थायी समितीच्या बैठकीत भाजपने एकदाही विरोध केला नाही. म्हणजे स्थायी समितीत ठराव पास करायचे आणि मग शिवसेनेवेर आरोप करायचे, हा शिवसेनेला बदनाम करण्याचा डाव आहे. हे निवडणुकीचे डावपेच आहेत, असं अनिल परब यांनी नमूद केलं.

"मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे नाव घेतलं नाही. मुख्यमंत्र्यांनी कारवाई करायचं ठरवलं असेल


तर त्यांनी ती करावी, आम्ही त्याचं स्वागत करु", असंही परब म्हणाले.


मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

मुंबई महापालिकेचं बजेट कोट्यवधीचं असूनही शहर पूर्णत: विकसित का नाही, असं सावाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवलं.

मुंबईतील कांदिवलीमधल्या उत्तर भारतीय स्नेह संमेलनात भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलांरांसह मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा