उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये नगरविकासाची कामं ठप्प पडल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी पालिकेच्य़ा मुख्यालयात तोडफोड केली. विशेष म्हणजे उल्हासनगर पालिकेचा सत्ताधारी पक्ष हा शिवसेनाच आहे.

 

शहरातील नागरिकांना कोणत्याही सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ पालिकेच्या मुख्यालयातील खुर्च्या आणि इतर सामानाची तोडफोड करण्यात आली. तसेच काही सुरक्षारक्षकांना मारहाणही करण्यात आली.

 

मारहाणी दरम्यान पालिकेत शिवसेनेचे शहरप्रमुख, उपशहरप्रमुख आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते. दरम्यान याबाबत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मनपा मध्ये शिवसेनेची सत्ता असून महापौर व स्थायी समिती सभापती देखील शिवसेनेचाच आहे