जे आमदार गेल्या पाच वर्षात 'मातोश्री'साठी नॉटरिचेबल राहिले आहेत, लोकसभेच्या निवडणुकीत कमी पडले आहेत, ज्यांच्याविरोधात पक्षांतर्गत तक्रारी आहेत, जनतेची कामं केली नाहीत, अशा पाच ते दहा जणांना डच्चू देण्याचा विचार शिवसेनने केला आहे.
या आमदारांच्या जागी शिवसेनेने दुसरे उमेदवार देण्याची तयारी सुरु केली आहे. पक्षात फूट पडू नये म्हणून हे नॉन परफॉर्मर आमदार कोण आहेत याची माहिती उघड केलेली नाही. त्यांची नावं आताच बाहेर आली तर पक्षात मोठं बंड होण्याची शक्यता आहे. म्हणून शिवसेनाही सावध पवित्रा घेताना दिसत आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोअर कमिटीने ही नावं काढली आहेत. तसंच इतर विद्यमान आमदारांना मात्र हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे विद्यमान आमदार सोडून इतर कोणत्या नव्या उमेदवारांना संधी मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.