मुंबई: शिवसेनेच्या दोन्ही गटाचे दसरा मेळावे (Shivsena Dasara Melava) धूमधडाक्यात पार पडले. महापालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यामध्ये कोण कुणावर तुटून पडणार, कोण बाजी मारणार आणि कट्टर शिवसैनिक कुणाच्या बाजूला याकडे राज्याचं लक्ष होतं. मागच्या वेळचा दसरा मेळावा गाजवणाऱ्या ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) फायर आजी (Shivsena Fire Ajji Chandrabhaga Shinde)  यंदा कुठे आहेत? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. फायर आजी यंदा दसरा मेळाव्यात दिसल्या नाहीत.

  


शिवसेनेच्या फायर आजी म्हटल्यावर अवघ्या महाराष्ट्राच्या नजरेसमोर येते ती राणा दाम्पत्यांना (Navneet rane) भिडणारी आजी चंद्रभागा शिंदे. ही तीच आजी आहे जिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही खडे बोल सुनावले होते. रिक्षावाला होता, त्याला आमदार केला, गेला तो गेला... साहेब तुम्ही काळजी करु नका असा उद्धव ठाकरेंना धीर देणारीही हीच आजी. ही आजी नाही तर शिवसेना ठाकरे गटाची फायर आजी आहे. आता त्याच आजीला शिवाजी पार्कच्या मैदानात शिवसैनिक शोधत होते. फायर आजी कुठे आहेत अशी चर्चा शिवाजी पार्कवर होती. 


नवनीत राणांना दम दिला आणि चर्चेत आल्या


उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणण्याचा निर्धार केला. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे त्यांना विरोध केला. त्याच वेळी नवनीत राणांच्या विरोधात हटके आंदोलन केल्यानंतर 92 वर्षाच्या फायर आजी चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर चंद्रभागा शिंदे यांच्या घरी भेटायला खुद्द उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे त्यांच्या घरी गेले होते.


फायर आजी चंद्रभागा शिंदे नेमक्या कोण?


शिवसेना ठाकरे गटाचा मागच्या वर्षीचा मेळावा गाजवणाऱ्या फायर आजींचे नाव हे चंद्रभागा गणपत शिंदे. शिवडी नाक्यावर भाजीचा व्यवसाय करायच्या. तसेच इतर सणावाराच्या वेळी त्या पूजेचं साहित्यही विकतात. या वयातही फायर आजी या पोलीसदूत म्हणून काम करतात आणि पोलिसांनाही सामाजिक कामात मदत करतात. आजींना दोन मुलं आणि दोन नातवंड आहेत. आजींचे पती बीपीटीमध्ये कामाला होता. सध्या ते हयात नाहीत. त्यामुळे आजींना त्यांची पेन्शन मिळते. 


फायर आजींना विचारलं की, तुम्ही केव्हापासून शिवसैनिक आहात, तर त्या बाळासाहेबांपासून शिवसैनिक असल्याचं सांगतात. तसं आजींचं शिवसेनेसोबतंच नातंही खास आणि तितकंच सलोख्याचं. बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकांपैकी एक चंद्रभागा आजी.


ही बातमी वाचा: