मुंबई: एकीकडे पर्यावरणाच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे 25 वर्षे महापालिका हातात असूनही घाण पाणी समुद्रात सोडायचं ही दुटप्पी भूमिका ठाकरेंची असल्याची टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. मुंबई महापालिका हातात असताना यांनी काहीच केलं नाही, आता पर्यावरणाच्या नावाखाली मेट्रोला विरोध करतात असंही ते म्हणाले. येत्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते प्रवेश करणार असून उद्धव ठाकरे यांच्या गटाला खिंडार पडणार असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
मुंबईच्या खार पूर्व भागात शिवसेनेतर्फे 'प्रश्न तुमचे उत्तर शिवसेनेचं' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदेंची प्रमुख उपस्थिती होती. लोकांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. यावेळी लोकांशी संवाद साधताना श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली
खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, लोकांसोबत संवाद साधण्यासाठी आणि त्यांची समस्या ऐकण्यासाठी, सोडवण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा ग्राउंड लेव्हलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. काल एका नगरसेवकाच्या पक्षप्रवेश झाला. गेले काही दिवस जर आपण पाहिलं तर दर दोन तीन दिवसामध्ये कुणी ना कुणी नगरसेवक, नेता उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आमच्याकडे पक्षप्रवेश करत आहे. येणाऱ्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणखी मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करतील आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला खिंडार पडेल.
गेल्या पंचवीस वर्षांमध्ये मुंबईमध्ये काही विकास झाला नाही. शौचालयाचं पाणी समुद्रामध्ये सोडण्यात येतं असं सांगत खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका केली. ते म्हणाले की, एका ठिकाणी आपण पर्यावरणाचा मोठ्या-मोठ्या बाता मारायचं, मेट्रोचे प्रकल्प थांबवायचं आणि दुसरीकडे मुंबई महापालिकेत 25 वर्ष सत्तेमध्ये असून सुद्धा साधे एसटीपी बांधू शकले नाही, ते घाण पाणी समुद्रात सोडलं.
दरम्यान या आधीही खासदार श्रीकांत शिंदे यांनी एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, गेली 25 वर्ष महापालिकेने मुंबईला कधीच खड्डेमुक्त केलेलं नाही, आता कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या लोकांना मिळणार नाही म्हणून त्यांची पोटदुखी होते. आम्ही नऊ वर्षांपासून लोकप्रतिनिधी आहोत तरी आम्हाला कॉन्ट्रॅक्टमध्ये लो प्राईस काय, हाय प्राईस काय, कमिशन काय हे कळत नाही, मात्र यांना हे सर्व कळतं. मुंबईची अवस्था सामान्य मुंबईकरांना माहित असून ते सुज्ञ आहेत.
ही बातमी वाचा :