आज राज्यात एकसंध राहून आणि राजकीय मतभेद विसरुन काम करण्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थिती सर्वांनी एकत्र येण्याची गरज राऊत यांनी व्यक्त केली. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत. आम्ही म्हणतो देशाला मोदींचीच गरज आहे. मात्र, ज्यांना याचं राजकारण करायचं आहे, अशा भाजप नेत्यांसाठी पंतप्रधान मोदी यांनी शिबिर घेऊन अशा संकट काळात सरकारसोहत राहून काम कसे करावे, हे शिकवण्याची गरज असल्याची टीका राऊत यांनी केलीय. कोरोनाच्या संकटात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात सुसंवाद आहे. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. केंद्र सरकार सहकार्य करत नाही, असं आम्ही कधीच म्हणलो नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केलं.
Coronavirus | पहिली ते आठवीची परीक्षा रद्द; नववी, अकरावीची परीक्षा 15 एप्रिलनंतर
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि आमदारांना प्रलोभन
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि आमदारांना प्रलोभनं दाखवली जात आहेत. ते या देशाला शोभणारं नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या व्यक्तींनी अशा लाभांच्या पदांपासून दूर राहावे. यामुळे न्यायपालिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचेही राऊत म्हणाले. दरम्यान, लोकांमध्ये जनजागृती आहे. मात्र, जे स्वतःला पुढारी समजतात ते या गोष्टी पाळताना दिसत नसल्याचे राऊत म्हणाले. मात्र, पुढील काळात सर्वांनी राष्ट्रहितासाठी घरात राहणे गरजेचे आहे. फक्त भारत माता की जय म्हणजे राष्ट्रभक्ती नाही. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत सर्वांनी एकत्र येत सरकारच्या सुचनांचे पालन करणे गरजेचे आहे. हीच प्रखर राष्ट्रभक्ती असल्याचे राऊत यांनी सांगितले.
Coronavirus | कोरोना व्हायरसपासून दूर राहण्यासाठी लोक आयुर्वेदाकडे; भिमसेनी कापूर, तुरटी अन् निलगिरी तेलाला मागणी
मी घरी राहणार, कोरोनाला हरवणार आणि जिंकणार : संजय राऊत
मी स्वतः कोरोना विषाणूपासून दूर राहण्यासाठी काळजी घेत आहे. यासाठी मी सामनाच्या ऑफिसमध्येच असतो. येथे लोकांच्या भेटीगाठी कमी केल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच आम्ही कमीतकमी लोकांमध्ये काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पुढील 15 दिवस तुम्हीही तुमच्या घरात राहण्याचं आवाहन राऊत यांनी केलं.
Health Minister on #Corona | गर्दीच होणार असेल तर मुंबईची लाईफलाईन बंद करावी लागेल - राजेश टोपे