मुंबई: शिवसेना आमदार अपात्रता (Shivsena MLA Disqualification Case)  सुनावणीचं नवं वेळापत्रक आता दसऱ्यानंतर तयार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासंबंधी महाराष्ट्राच्या महाधिवक्त्यांसोबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) चर्चा करणार आहेत. तसेच राहुल नार्वेकर दसऱ्यानंतर दिल्ली दौऱ्यावरही जाणार आहेत. आमदारांच्या अपात्रतेसबंधित 30 ऑक्टोबरपर्यंत नवे वेळापत्रक सादर करावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दिल्ली दौऱ्यावर जाणार असून त्यावेळी नवे वेळापत्रक तयार करण्यासंदर्भात कायदा तज्ज्ञांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. 


विधानसभा आमदारांविरोधातील अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीस जाणीवपूर्वक विलंब होत असल्याने सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांना दोन वेळा अत्यंत कठोर शब्दांत फटकारलं आहे. या सुनावणीचे वेळापत्रक 30 ऑक्टोबरला सादर करण्याचे आदेश दिले आहेत आणि दोन महिन्यात निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे. 


कोर्ट काय म्हणाले?


11 मे पासून अध्यक्षांनी केलेले नाही. विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावेच लागेल,  अशी टिप्पणी सरन्यायाधिशांनी केली आहे.दैनंदिन काम करताय तर त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल.  जर तुम्ही ठोस निर्णय घेत नसाल तर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल.  याचिका निवडणूक आयोगासमोर नाही तर अध्याक्षांसमोर आहे. आतापर्यंत झलेले छोटे मोठे निर्णय सांगू नका, अध्यक्षांचे वेळापत्रक द्या. दसऱ्याच्या सुट्टीमध्ये  अध्यक्षांसमोर बसून तुषार मेहता  वेळापत्रक ठरवतील, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.  


विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणी 26 ऑक्टोबरला


दरम्यान, आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर  यांच्यासमोरची पुढची सुनावणी 26 ऑक्टोबरला होणार आहे. आजच्या सुनावणीत वर्गवारी करण्यात आले. 34  वेगवेगळ्या याचिका आता यापुढे 6 याचिकेत मांडल्या जातील. ठाकरेंच्या वकिलांनी आज पुन्हा एक नवा अर्ज केला आहे. काही डॉक्युमेंट हे शिंदे गटाकडून मागितले. 25 ऑक्टोंबरपर्यंत सगळ्यांनी आपले मत मांडायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या म्हणजे 26 ऑक्टोबरला पुढची सुनावणी होईल. 


ठाकरे गट प्रत्येक सुनावणीत नवा अर्ज देत आहे त्यामुळे ही सुनावणी लांबत आहे, असं अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. अर्जावर अर्ज येत आहेत. जर अर्ज येत राहिले तर सुनावणी लांब जाईल. सुप्रीम कोर्टातील याचिका वेगळी आहे. इथली याचिका वेगळी आहे. हे ट्रिब्यूनल अर्थात लवात आहे. इथे प्रक्रिया आहे. इथे ट्रायल होते, असं राहुल नार्वेकर म्हणाले.


ही बातमी वाचा: