मुंबई: शिवसेनेचे मंत्री आणि आमदार काल रात्री आपल्या तक्रारी घेऊन थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरच पोहोचले. भाजप आणि शिवसेना मंत्र्यांच्या निधी वाटपातील दुजाभाव, शिवसेनेच्या मंत्र्यांची प्रलंबित काम आदींसंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. येत्या अर्थसंकल्पात या सर्व प्रलंबित मागण्यांचा विचार व्हावा अशी विनंती यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केल्याचं समजतं आहे.

यावर मुख्यमंत्र्यांनी देखील उद्धव ठाकरेंनी दिलेल्या यादीवर विशेष अधिकारी नेमल्याचं सांगितलं. तसंच शिवसेना आणि भाजपमध्ये समन्वय राहण्यासाठी समिती नेमण्यावरही या बैठकीत चर्चा झाली असल्याचं समजतं आहे. या समितीत दोन्ही पक्षाच्या तीन-तीन मंत्र्यांचा समावेश असेल असंही या बैठकीत ठरवण्यात आलं.

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमधील संबंध बरेच बिघडले होते. मात्र, त्यानंतर भाजपनं मुंबई महापौर निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊन शिवसेनेला मोठा दिलासा दिला. त्यानंतर दोन्ही पक्षात असणारं तणावाचं वातावरण आता हळूहळू निवळू लागलं आहे.

संबंधित बातम्या:

‘कुठे गेले, राजीनामे कुठे गेले?’, विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

विश्वनाथ महाडेश्वर महापौर, हेमांगी वरळीकर उपमहापौर