एबीपी माझाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, लॉकडाऊन, नोटबंदी अशा अनेक विषयांवर तुम्ही येऊन बोलता. चीन आमच्या जमिनीवर घुसलाय का? हा प्रश्न राहुल गांधी वारंवार विचारताय त्याच्यावर उत्तर देणे गरजेचे आहे.
चीनचे किती जवान मारले हे जे आकडे येतयेत ते आकड्यावर आपण बोललं पाहिजे. संघर्षाच्या काळात आपण देशाचे नेते आहेत. दिल्लीत सरकार मजबूत आहे. आपण जो निर्णय घ्याल या जवानांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यासाठी संपूर्ण देश तुमच्या पाठीशी असेल. राजकीय मतभेद विसरून देश तुमच्या पाठीशी उभा राहील. पण चीनला धडा शिकवण्याची जबाबदारी ही नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग, अमित शाह यांची आहे, असं राऊत म्हणाले. ते महाबली, धाडसी आहेत, ते बाहुबली आहेत, शूरवीर आहेत त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, असं देखील ते म्हणाले.
संजय राऊत यांनीही यासंदर्भात एक ट्विट देखील केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, 'चीनच्या घुसखोरी केव्हा चोख प्रत्युत्तर मिळणार आहे? गोळीबार न होता आपले 20 जवान शहीद झाले आहेत. आपण काय केलं? चीनचे किती सैनिक मारले गेले? चीननं भारताच्या हद्दीत घुसला आहे का? पंतप्रधानजी, संघर्षाच्या या काळात देश तुमच्या सोबत आहे. पण, सत्य काय आहे? बोला. काहीतरी बोला. देशाला सत्य ऐकायचं आहे. पंतप्रधानजी तुम्ही शूर व यौद्धे आहात. तुमच्या नेतृत्वाखाली देश चीनचा बदला घेईल… जय हिंद,'.