बॅनरवर वाढदिवसानिमित्त देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्रित होतेच पण इतकंच नाही तर राष्ट्रवादीचे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो देखील एकाच बॅनरवर दिसून आलं. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचेही फोटो या बॅनरवर आहेत.
ऐरवी एकमेकांच्या विरोधात शड्डु ठोकणारे राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते इथे चक्क एकत्र दिसून आले. नुकताचं राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नरेंद्र पाटील यांच्या माथाडी कामगार संघटनेने हा शुभेच्छांचा फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी का होईना पण राष्ट्रवादी भाजपची युती झाली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.
कोण आहेत नरेंद्र पाटील?
- माथाडी कामगारांचे नेते म्हणून परिचित
- नरेंद्र पाटील हे माथाडी कामगार संघटनेचे नेते आणि संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र आहेत.
- नरेंद्र पाटील हे विधानसभा सदस्यांनी निवडून दिलेले आमदार होते.
- ऱाजीनाम्यानंतर भाजपच्या संपर्कात होते.
- अखेर लोकसभा निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश