मुंबई : मुंबईत मतदार यादीमध्ये मोठा घोळ झाल्याची शंका आहे. कारण 2012 च्या निवडणुकीत होती, ती तब्बल 11 लाख नावं यावर्षीच्या मतदार यादीतून गायब झाली आहेत. त्यामुळे या मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित रहावं लागणार आहे.


विशेषतः मालाड, घाटकोपर, वरळी, बोरीवली या ठिकाणच्या मतदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकांनी विधानसभा निवडणुकीला मतदान केलं होतं. पण आता नावं यादीतून वगळण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर मतदार याद्या नियमित केल्यानंतर 11 लाख मतदारांचं नाव वगळण्यात आलं. यामध्ये काही जण मृत असल्याचं किंवा काही मुंबईत राहत नसल्याचं कारण सांगितलं जात आहे.

नेमकं कोणत्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचं, कोणत्या यादीत आपलं नाव असेल, असे अनेक प्रकारचे संभ्रम मतदारांमध्ये आहे.

संबंधित बातम्या :

मतदान ओळखपत्र नसेल तर काय करायचं?


शरद पवारांच्या वॉर्डात राष्ट्रवादीचा उमेदवारच नाही!


महापालिकेसाठी प्रभाग पद्धतीत कसं मतदान करायचं?


BMC Election 2017 LIVE : मुंबईत 1.30 वाजेपर्यंत 32.17 टक्के मतदान