मुंबई : ठाकरेंची जनरेशन नेक्स्ट फुटबॉलप्रेमानं एकत्र आल्याचं वृत्त एबीपी माझानं दाखवल्यानंतर, यावर शिवसेनेकडून खुलासा देण्यात आला आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंची ती भेट म्हणजे, निव्वळ योगायोग असल्याचं स्पष्टीकरण शिवसेनेच्या वतीनं देण्यात येत आहे.
शनिवारी रात्री फुटसल लीग स्पर्धेनिमित्त आदित्य आणि अमित ठाकरेंनी एकमेकांची भेट घेतली. लोअर परळमधील सेंट रेजिस हॉटेलमध्ये ही भेट झाली. अर्धा ते पाऊण तास दोघांमध्ये चर्चा झाल्याचं वृत्त एबीपी माझानं दाखवलं होतं.
त्यानंतर शिवसेनेनं ती भेट निव्वळ योगायोग असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. ‘’आदित्य ठाकरे एमडीएफएचे अध्यक्ष असल्यामुळे एका फुटबॉल स्पर्धेच्या आयोजकांनी आदित्य यांची भेट मागीतली होती. त्याच वेळी आदित्य ठाकरे यांनी फिगो ह्यांची सदिच्छा भेट घेतली. तिथे अमित ठाकरे देखील उपस्थित होते. याशिवाय, इतरही 10-12 जण यावेळी तिथे उपस्थित होते. तेव्हा आदित्य आणि अमीत भेटले, यात विश्लेषण करण्यासारखे काही घडले नाही, शिवाय, दोघांमध्ये कोणतीही राजकीय चर्चा देखील झाली नाही." असं स्पष्टीकरण शिवसेनेच्यावतीने देण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या
फुटबॉलप्रेमानं ठाकरे बंधूंची नेक्स्ट जनरेशन एकत्र, आदित्य-अमित ठाकरेंची भेट
आदित्य-अमित ठाकरेंची ‘ती’ भेट निव्वळ योगायोग, शिवसेनेचं स्पष्टीकरण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Sep 2017 11:58 AM (IST)
आदित्य आणि अमित ठाकरेंच्या भेटीवर शिवसेनेकडून खुलासा देण्यात आला आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंची ती भेट म्हणजे, निव्वळ योगायोग असल्याचं स्पष्टीकरण शिवसेनेच्या वतीनं देण्यात येत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -