दरम्यान ब्रीच कॅन्डी येथील अमरसन्स गार्डन येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर उपस्थित होते.
भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांना निमंत्रण देण्यात आले होते. परंतु पक्षातील वरिष्ठांनी या कार्यक्रमाला कोणीही न जाण्याचे आदेश दिल्याने ते या कार्यक्रमासाठी उपस्थित नव्हते, असे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याचे उद्धव ठाकरे याना आमंत्रण दिले नसल्याने शिवसेनेने कोस्टल रोडच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामधून भाजपला डावलून त्याची परतफेड केली आहे.
कोस्टल रोड हे माझे स्वप्न नसून प्रत्येक मुंबईकरांचे स्वप्न आहे. याचे संपूर्ण श्रेय मुंबईकरांना जाते. या प्रकल्पासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या दिल्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे आभार. तसेच या प्रकल्पामुळे कोळी बांधवांचे नुकसान होणार नाही, याची आम्ही खबरदारी घेतली आहे. - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
राज ठाकरेंनी घेतली कोळी बांधवांची भेट
या कोस्टल रोडला मुंबईतल्या कोळी बांधवांचा विरोध आहे. त्यामुळे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळीतल्या कोस्टल रोडमुळे बाधित होणाऱ्या मच्छिमारांची भेट घेतली. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या वरळीतील स्थानिकांशी त्यांनी संवादही साधला. कोस्टल रोडमुळे मासेमारी धोक्यात येत असल्याने कोळी बांधवांचा याला विरोध आहे.
कोस्टल रोड हा उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे राज ठाकरे याबाबत नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवलीपर्यंत एकूण 35.6 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असणार आहे. समुद्र किनारपट्टीलगत भराव टाकून तसंच पूल आणि बोगदा असे गुंतागुंतीचे हे बांधकाम असणार आहे.
संबधित बातम्या