मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेचे नेते युती होणारच, असं दोन्ही पक्षांकडून सांगितलं जात आहे. मात्र तरीही दोन्ही पक्षातील जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेना 50-50 टक्क्याच्या फॉर्म्युल्यासाठी आग्रही आहे. तर भाजपला हा फॉर्म्युला मान्य नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


भाजप 174 आणि शिवसेनेला 114 जागा अशा प्रस्तावावर भाजप नेतेही ठाम आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आपापल्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्ष ठाम असल्यामुळे युतीचा गुंता कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.


दोन्ही पक्षांनी144-144 जागा वाटून घेण्याची शिवसेनेची भूमिका आहे. तर घटक पक्षांना देण्यात येणाऱ्या 18 जागांपैकी 9-9 जागा दोन्ही पक्षांनी आपल्या कोट्यातून द्याव्यात, अशी शिवसेनेची मागणी असल्याचं समोर येत आहे.


विधानसभा निवडणुकीतील जागावाटप आणि फॉर्म्युल्याबाबत दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये चर्चा होत आहेत. मात्र शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपाचा अंतिम चर्चा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांच्यात होणार आहे. तर अंतिम निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह घेणार आहेत.


संबंधीत बातम्या