उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या मुख्यालयात भाजप-सेनेमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. ई-टेंडरिंग निविदा भरण्यावरुन शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश जाधव आणि भाजपचे नगरसेवक प्रदिप रामचंदानी यांच्यात बाचाबाची झाली. याचे पर्यावसन हाणामारीत झाले.
काल संध्याकाळच्या सुमारास महापालिका मुख्यालयात ई-टेंडरिंग निविदा भरण्याची प्रक्रिया सुरु होती. त्यामध्ये प्रभाग 13 मध्ये होणाऱ्या कामाच्या निविदा शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश जाधव यांच्या मुलाने आणि भाजपाचे स्विकृत नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्या मुलाने ई-टेंडरिंग द्वारे निविदा भरल्या.
यावरुनच महापालिकेच्या बांधकाम विभागात माजी नगरसेवक सुरेश जाधव व भाजपाचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर वाद अधिकच चिघळल्याने कार्यालयातच दोघामध्ये हाणामारीचा प्रकार घडला. हा प्रकार सुरु असताना कोणीतरी त्याचे मोबाईलवर चित्रीकरण करुन याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल केला.
भाजप नगरसेवक रामचंदानी व माजी नगरसेवक जाधव यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेत, एकमेकांविरोधात अदाखलपात्र गुन्हे दाखल केले आहे. दरम्यान, यापूर्वीही भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना एका ठेकेदाराने स्थायी समितीच्या दालनातच मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.
उल्हासनगर महापालिकेत शिवसेना-भाजप नगरसेवकांमध्ये हाणामारी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Feb 2018 01:40 PM (IST)
ई-टेंडरिंग निविदा भरण्यावरुन शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश जाधव आणि भाजपचे नगरसेवक प्रदिप रामचंदानी यांच्यात बाचाबाची झाली. याचे पर्यावसन हाणामारीत झाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -