Aditya Thackeray Mumbai Mahamorcha : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या कामातील भ्रष्टाचारावरुन महापालिकेवर महामोर्चा काढला. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली. ही मुंबई आमची आहे, तिला दिल्लीच्या आदेशावरुन लुटू नका असं आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईतील रस्त्यांच्या कामात 40 टक्के कमिशन खाल्ले जातंय असा आरोपही त्यांनी केला. आदित्य ठाकरे यांच्या भाषणातील दहा प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे, 


1. मुंबई आमची, तिला दिल्लीच्या आदेशावरुन लुटू नका


ही मुंबई आमची आहे, तिला दिल्लीच्या आदेशावरुन लुटू नका असं आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबई महापालिकेवर दिल्लीतील भाजपच्या नेत्यांचा डोळा असून खोके सरकारला हाताशी धरुन महापालिका ताब्यात घेण्याचे त्यांचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत असं आदित्य ठाकरे म्हणाले. 


2. समझनेवाले कों इशारा काफी हैं


आदित्य ठाकरे म्हणाले की, हा आक्रोश आणि ही गर्दी पाहिल्यावर समझने वालों को इशारा काफी है हा संदेश जातोय. ही जी गर्दी आहे, जे भगवं वादळ दिसत आहे ते बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं आहे. इकडचा आवाज आता दिल्लीलाही ऐकायला लागतोय.  आजूबाजूंच्या भुतांना गाढायचं आहे, या खोके सरकारला गाढायचं आहे. 


3. चोरांच्या फाईल तयार, त्यांना तुरुंगात टाकणार


मुंबईतील रस्त्यांच्या कामात मोठा भ्रष्टाचार होत असून याची सर्व माहिती आपल्याकडे आहे. चोरांच्या फाईल तयार असून आमचं सरकार आल्यानंतर या सगळ्यांना जेलमध्ये टाकणार असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. 


4. इथला आवाज दिल्लीला ऐकावा लागतोय


पालिकेची इमारत हे आपसं शक्तीपीठ आहे. इथला आवाज दिल्लीलाही ऐकावा लागतो. हनुमान चालिसेत म्हटल्याप्रमाणे इथं बसलेली भूत आपल्याला पळवून लावायची आहेत. मुंबई कधी दिल्लीसमोर झुकली नाही, यांना आपल्याला कटोरं घेऊन उभं करायचं आहे.


5. आपलं सरकार आलं तर यांच्यावर बुलढोझर चालवायचं


मी एकटा लढायल तयार आहे, फक्त तुम्ही साथ द्या. जो हातोडा चालवला तो कोणाच्या फोटोवर चालवलात? कोणी आदेश दिला होता? आजपासून हेच ध्येय्य डोळ्यासमोर ठेवा, आपलं सरकार आलं की यांच्यावर बुलढोझर चालवायचा आहे. 


6. रस्ता तयार करताना 42 प्रक्रियेतून जावं लागतं 


आम्ही मुंबईचे रस्ते काँक्रिटीकरण करणार असल्याचं खोके सरकारने सांगितलं. एखादा रस्ता खोदायला गेला किंवा तयार करायला गेला तर एकून 42 प्रक्रियातून काम केलं जातं. वाहतूक पोलिसांनाही विचारावं लागतं, तसेच राज्य सरकारच्या आणि केंद्राच्या 16 एजन्सी आहेत, त्यांना विचारावं लागतं. पण घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात की मुंबईत 400 किमीचे रस्ते तयार करणार, हे सर्व त्यांना काही माहिती नसल्याने ते बोलतात. 


7. रस्त्यांच्या कामात 40 टक्के कमिशन खाल्लं 


मुंबईतील रस्ते हे मुंबईकरांसाठी नव्हे तर यांना कमिशन खाता यावं यासाठी केले जात आहेत. पहिला यांनी रस्त्यांच्या किमती वाढवल्या, टेंन्डरमध्ये घोटाळा केला. पाच हजार कोटींच्या रस्त्याची किंमत 6080 कोटी रुपये वाढवली. त्यातून यांनी 40 टक्के कमिशन खाल्लं.


8. पाच लोकांसाठी ही कामं 


मुंबईतील रस्ते हे पाच लोकांसाठी तयार करण्यात येत असून पाच लोकांना त्याचं काम दिलं जात आहेत असा आरोप करत आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईतील रस्त्यांचं काम हे पाच झोनमध्ये केलं जात आहे. पाच लोकांना काम दिलं जाऊन त्यामध्ये कमिशन खाल्लं जात आहे. 


9. निवडणूक घ्या, मग मुंबईकर कुणाच्या पाठिशी हे समजेल


आम्ही जी 20 वर्षात कामं केली ती आता दाबली जात आहेत. एक वर्ष झालं अजून महापालिकेला महापौर नाही, नगरसेवक नाहीत, समित्या नाहीत, त्यामुळे कामं खोळांबळी आहेत. खोके सरकारला एवढा विश्वास असला तर त्यांनी एकदा निवडणूक घ्यावी, मग मुंबईकर कुणाच्या मागे आहेत ते समजेल. 


10. खोके सरकारचा फोन येतो आणि बिल्डरची कामं होतात.


आदित्य ठाकरे म्हणाले की, अलिबाबा आणि चाळीच चोरांनी या मुंबईला लुटलं, त्यांच्या मित्रांना आणि बिल्डरना काम दिली जात आहेत, भ्रष्टाचार केला जात आहे. खोके सरकारचा फोन आला की त्यांची कामं होतात पण सर्वसामान्यांची कामं होत नाहीत हे दुर्दैव. महापालिकेत जो भ्रष्टाचार सुरू आहे त्याची चौकशी केली जावी अशी मागणी आम्ही राज्यपालाकडे केली आहे. 


ही बातमी वाचा: