डोंबिवली: फेरीवाल्यांना हटवण्याच्या नावाखाली डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात राडा घालणाऱ्या 4 शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, हा राडा करण्यासाठी शिवसैनिकांना उद्युक्त करणारे शिवसेनेचे नगरसेवक दिपेश म्हात्रेंवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.


दरम्यान, डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना सुद्धा युवा सैनिकांनी फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केल्यामुळं आश्चर्य व्यक्त करण्यात येतं आहे.

डोंबिवली स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर फेरीवाले आहेत. त्यामुळे स्टेशनला ये-जा करण्यास मोठ्या प्रमाणात त्रास होतो. मात्र, पालिका प्रशासना मार्फत रितसर कारवाई करण्याएवजी शिवसेनेनं कायदा हातात घेतल्याचं पाहायला मिळालं.

शिवसैनिकांनी फेरीवाल्यांच्या सामानाची नासधूस केल्याचं दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतं आहे. त्यामुळं सत्ताधारी शिवसेनेचा प्रशासनावर वचक नाही का? असा सवाल उपस्थित केला जातो.

काय आहे नेमकं प्रकरण:

डोंबिवली पश्चिमेतील स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर फेरीवाले आहेत. त्यामुळे स्टेशनला ये-जा करण्यास नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होते. अखेर आज युवासैनिकांनी सेना स्टाईल आंदोलन करत फेरीवाल्यांच्या सामानाची नासधूस केली.

दरम्यान, शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखील आज हे आंदोलन करण्यात आलं. ‘गेल्या अनेक वर्षापासून डोंबिवलीतील स्टेशन परिसरात फेरीवाले बसतात. यासंबंधी वांरवार पालिकेशी संपर्क साधून देखील कोणतीही कारवाई होतं नसल्यानं आम्हाला हे पाऊल आज उचलावं लागलं.’ असं दीपेश म्हात्रे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. याचवेळी त्यांनी या भागातील मनसे नगरसेवक आणि पालिका अधिकारी फेरीवाल्यांकडून हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोपही केला.

संबंधित बातम्या:

डोंबिवलीत सत्तेत असलेल्या शिवसेनेची राडेबाजी, फेरीवाल्यांची दुकानं उद्ध्वस्त