मुंबई : शिवाजी पार्क (Shivaji Park Zoo) इथल्या मरीन अॅक्वा झूमधून प्राणी चोरीला गेलेत. सहा अजगरांसह दोन घोरपडी, एक पाल आणि एक सरडा चोरीला गेलाय. चोरीला गेलेले सगळे प्राणी परदेशी प्रजातीचे आहेत. झूमधील कथित अनधिकृत बांधकामावर बीएमसीने (BMC) सोमवारी तोडक कारवाई केली होती. झूमधील अनधिकृत बांधकाम तोडताच एक्झॉटिक एनिमल चोरीला गेलेत. प्राणी संग्रहालयावरील कारवाईमागे राजकीय सूडबुद्धी असल्याचा प्राणी संग्रहालय प्रशासनाने आरोप केलाय. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. प्राणी संग्रहालयाच्या विश्वस्तांच्या तक्रारीनंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
प्राणी संग्रहालयातील अनधिकृत बांधकामावर सोमवारी मुंबई महापालिकेची तोडक कारवाई करण्यात आली. झू मधील अनधिकृत बांधकाम तोडताच एक्झॉटिक एनिमल चोरीला गेले आहेत. प्राणी संग्रहालयावरील कारवाई मागे राजकीय सूडबुद्धी असल्याचा प्राणी संग्रहालय प्रशासनाचा आरोप केला आहे. प्राणी संग्रहालयाच्या शेजारी असलेल्या पालिकेच्या जलतरण तलावामध्ये मगरीचे पिल्लू सापडल्यानंतर प्राणी संग्रहालय चर्चेत आलं होतं. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्राणी संग्रहालयाच्या विश्वस्तांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला आहे. चोरी झालेल्या प्राण्यांची किंमत साडेचार लाख रुपयांच्या घरात आहे.
प्राणी संग्रहालयात कोणकोणते प्राणी?
ससा, कोकेटेल, मलार्ड डक्स, कार्पेट पायथन 14 फूट वाढतो, बॉल पायथन 6 फूट वाढतो, अर्जेंटिना टाग्यू घोरपड, ब्ल्यू टंग स्किंग ( साप सुरळी), एम्पेरोर विंचू, इग्वाना, बंगाल मार्बल मांजर, रेड आयड स्लायडर कासव हे प्राणी आणि पक्षी तसेच अलिगेटर गार, अरोवना, फ्लॉवर हॉर्न, परोट फिश, पिराना, angel's, हे मासे या प्राणी संग्रहालयामध्ये आहेत,
प्राणी संग्रहालयाचे मालक कोण?
सध्या ही जागा वाईल्ड लाईफ वाँडरर्स नेचर फाउंडेशन यांच्या मालकीची आहे. तर ही जागा नंदकुमार मोघे यांच्या मालकीची आहे. नंदकुमार मोघे आयएएस ऑफिसर होते. ते महाराष्ट्र सरकार मध्ये वाईल्ड लाईफ ॲडव्हायझर, मुंबई महानगरपालिकेमध्ये वाइल्डलाइफ अॅन्ड झू अॅडवायझर, महाराष्ट्र सरकारच्या टायगर सफारीचे को चेअरमन अश्या विविध मोठ्या पदांवर त्यांनी काम केलं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि नंदकुमार मोघे यांचे घरचे संबंध होते. महाराष्ट्रातील अनेक अभयारण्य आणि राष्ट्रिय उद्याने तयार करण्यात बाळासाहेबांनी मोघे यांना प्रोत्साहन दिले होते. सध्या मोघे घरीच असतात, त्यांचा मुलगा युवराज मोघे ही फाउंडेशन आणि प्राणी संग्रहालय सांभाळतो. लोकांना अशा प्राण्यांबद्दल साक्षर करण्यासाठी आम्हीही संस्था चालवत असल्याचे त्या संग्रहालय चालकांचे म्हणणे आहे.
मगरीचे पिल्लू आले होते बाहेर
मुंबईच्या शिवाजी पार्कमधल्या (Shivaji Park) महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये (Mahatma Gandhi Memorial Swimming Pool) एक मगर आढळली. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती. एका कर्मचाऱ्याने मगरीला पाहिल्यानंतर तिला पकडून ड्रममध्ये ठेवलं. यादरम्यान मगरीने एका कर्मचाऱ्याला चावा देखील घेतला. पहाटे ऑलम्पिक आकाराच्या आणि शर्यतीसाठीच्या तरण-तलावात (Olympic size Racing Swimming Pool) मगरीचे पिल्लू आढळून आले होते. त्यानंतर सहा तासांनी मगर वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली. याआधी देखील अजगर आणि सापासारखे अनेक प्राणी त्याच प्राणीसंग्रहालयातून सुटून बाहेर पडल्याने लोकांमध्ये घबराट पसरली होती.