Shiv Sena Vardhapan Din LIVE: अनेक शिवसैनिकांनी रक्त सांडलं, घाम गाळला त्यांचा मला अभिमान : उद्धव ठाकरे

Shiv Sena Vardhapan Din : शिवसेनेचा 56वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे.   विधानपरिषद निवडणूक आणि वाढत्या कोरोना रुग्णांमुळे मुख्यमंत्री ठाकरे ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Jun 2022 01:53 PM
मत म्हणजे फक्त शिक्का नसतो तर आयुष्य असतं : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मत म्हणजे फक्त शिक्का नसतो तर आयुष्य असतं. सचिन अहिर चांगले काम करत आहे. गेलया दोन वर्षात त्यांची टेस्ट घेतली. चांगलं काम करत आहे. शिवेसेनेचे दोन्ही उमेदवार चांगले आहेत. शिवसेनेत संधी नाही मिळाली तर कोणी नाराज होत नाही. शिवसैनिक मिळेल त्या संधीचं सोनं करतात. दिवसागणिक आपली यशाची कमान वाढती राहो, अशी आशा यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.   


 

मत म्हणजे फक्त शिक्का नसतो तर आयुष्य असतं : मुख्यमंत्री

मत म्हणजे फक्त शिक्का नसतो तर आयुष्य असतं. सचिन अहिर चांगले काम करत आहे. गेलया दोन वर्षात त्यांची टेस्ट घेतली. चांगलं काम करत आहे. शिवेसेनेचे दोन्ही उमेदवार चांगले आहेत.


 

महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालत नाही : मुख्यमंत्री 

आमच्यात फूट पडू शकत नाही. तुम्ही देशात जर काही केलं तर महाराष्ट्र वेगळा विचार करु शकतो. महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालत नाही. शेराला सव्वाशेर असतोच असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी बाजपवर निशाणा लगावला. 

अग्निपथ योजना म्हणजे मृगजळ : मुख्यमंत्री

अग्निपथ योजनेवरुन मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारवर टीका. नोकरी चालकाची पण नाव अग्निवीर. अग्निपथ योजना म्हणजे मृगजळ असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 


 

शिवसेनेनं दिलेली सगळी वचनं पूर्ण केलं : उद्धव ठाकरे 

शेतकरी कायदे आले तेव्हा शेतकरी रस्त्यावर आले. त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला पण ते मागं हटले नाहीत. वचनं पूर्ण करणारी दिली पाहिजे. शिवसेनेनं एकही गोष्ट अशी केली नाही की बोललो आणि ते केलं नाही. आम्ही दिलेलं वचनं पूर्ण केली.


 

शिवसेनेचा जन्म भूमिपुत्राच्या न्याय हक्कासाठी झाला : उद्धव ठाकरे  

जिवाला जीव देणारा सैनिक लाभला हे माझं भाग्य. ज्याच्याकडे धाडस नसतं त्याच्याकडे मरण्यापेक्षा दुसरं काही नसतं. शिवसेनेचा जन्म भूमिपुत्राच्या न्याय हक्कासाठी झाला : उद्धव ठाकरे  

शिवसेनेत गद्दार कोणी राहिला नाही : मुख्यमंत्री

राज्यसभेत एकही मत फुटले नाही. कोणी कलाकारी केल्या ते माहित आहे. उद्याच्या निवडणुकीत फाटाफुटीची शक्यता नाही. शिवसेनेत गद्दार कोणी राहिला नाही. शिवसेना मजबुतीनं उभी राहिली असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

उद्याची निवडणूक जिंकणारच : उद्धव ठाकरे

मला निवडणुकीची चिंता नाही. हार जीत होत असते, उद्याची निवडणूक जिंकणार आहोतच.

चांगला कार्यकर्ता गेला की नुकसान होतं : मुख्यमंत्री

चांगला पायलट गेला तर मोठं नुकसान होतं, तसेच चांगला कार्यकर्ता गेला की नुकसान होतं असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांचं मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक

पहिल्या फळीतील नेते सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांचा मुख्यमंत्र्यांनी केला आवर्जून उल्लेख. या दोघांचेही त्यांनी केलं कौतुक. तुम्हाला निवृत्त होऊ देणार नाही. तुम्ही मला आणकी सक्रिय पाहिजे : मुख्यमंत्री

अनेक शिवसैनिकांनी रक्त सांडलं, घाम गाळला त्यांचा मला अभिमान : उद्धव ठाकरे

अनेक शिवसैनिकांनी रक्त सांडलं, घाम गाळला त्यांचा मला अभिमान असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हमाले.

प्रत्येक दिवस आपला, 56 वर्षाच्या बऱ्याच गोष्टी मनात ताज्या झाल्या : मुख्यमंत्री

अनेक शतकं शिवसेना राहणार आहे. संजय राऊत यांनी फादर्स डे चा उल्लेख केला. त्यांनीच पक्षाला जन्म दिला. प्रत्येक दिवस हा आपला असतो. 56 वर्षाच्या बऱ्याच गोष्टी मनात ताज्या झाल्या असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. मी ज्यावेळी पहिल्यांदा पक्ष प्रमुखाची सुत्र हातात घेतली त्यावेळी माझ्या मनात शिवसेनेचा स्थापना दिवस आठवला.  

अंगावर आलात तर फक्त शिंगावर घेणार नाही तर तुटवून लावू : संजय राऊत

अंगावर आलात तर फक्त शिंगावर घेणार नाही तर तुटवून लावू, संजय राऊतांचा इशारा

शिवसेनेचा बाणा हा स्वाभिमानाचा : संजय राऊत

शिवसेनेचा बाणा हा स्वाभिमानाचा, राष्ट्रीय, मराठी, अन्यायाविरुद्ध लढण्याचा बाणा आहे. हा बाणा सर्वांच्या छाताडावरती उभा राहिलं.   


 

उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व असल्यामुळं महाराष्ट्र शांत : संजय राऊत 

राज्याची सुत्रं ही उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. त्यामुळं महाराष्ट्र शांत आहे. हे राज्य सर्वांना एकत्र करुन चालवावं लागेल, कपट कारस्थान करुन राजकारण होणार नसल्याचे राऊत फडणवीसांना उद्देशून म्हणाले.

फार घमंड करु नका, राज्याची सुत्रं ही उद्धव ठाकरे यांच्याकडेचं : संजय राऊत

राजकारणात काही लोकांना फार घमंड आली आहे. एक जागा जिंकली म्हणजे जग जिंकलं नाही. राज्याची सुत्रं ही उद्धव ठाकरे यांच्याकडे असतील, फार घमंड करु नका. तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही खानदानी आहे, असे म्हणत राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. बादशाहीला नख लावण्याची हिंमत कोणाची झाली नाही. 

बाळासाहेब ठाकरे हे' फादर ऑफ हिंदुत्व' : संजय राऊत

56 वर्षापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठिणगी टाकली. त्या ठिणगीचा आज देशभर वणवा झाला असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे बाप असल्याचे राऊत म्हणाले.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वेस्ट इन मध्ये आगमन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वेस्ट इन मध्ये आगमन झालं आहे. थोड्याच वेळात ते संवाद साधणार आहे. मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. 

शिवसेनेकडून आजच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक टीझर जारी

दरम्यान शिवसेनेकडून आजच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक टीझर जारी करण्यात आला आहे. या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या तिघांच्या भाषणाची एक एक वाक्य दिली आहेत.  यात हिंदुत्व आणि भगव्याचं राजकारण यावर भाष्य करण्यात आलंय.  विधान परिषद  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वेस्ट इन हॉटेलमध्ये शिवसेनेकडून वर्धापन दिनाचं सेलिब्रेशन करण्यात येणार आहे.

Shiv Sena Vardhapan Din : शिवसेनेचा 56वा वर्धापन दिन आज

Shiv Sena Vardhapan Din : शिवसेनेचा 56वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे.  मात्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतील हॉटेल वेस्ट इनमध्ये मुक्कामी आहेत. याच ठिकाणी शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. विधानपरिषद निवडणूक आणि वाढत्या कोरोना रुग्णांमुळे मुख्यमंत्री ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. राज्यसभा निवडणुकीतील पराभव आणि उद्या होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय कानमंत्र देणार याकडं लक्ष लागलं आहे. 

पार्श्वभूमी

Shiv Sena Vardhapan Din : शिवसेनेचा 56वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे.  मात्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतील हॉटेल वेस्ट इनमध्ये मुक्कामी आहेत. याच ठिकाणी शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. विधानपरिषद निवडणूक आणि वाढत्या कोरोना रुग्णांमुळे मुख्यमंत्री ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. राज्यसभा निवडणुकीतील पराभव आणि उद्या होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय कानमंत्र देणार याकडं लक्ष लागलं आहे. 


दरम्यान शिवसेनेकडून आजच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक टीझर जारी करण्यात आला आहे. या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या तिघांच्या भाषणाची एक एक वाक्य दिली आहेत.  यात हिंदुत्व आणि भगव्याचं राजकारण यावर भाष्य करण्यात आलंय.  विधान परिषद  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वेस्ट इन हॉटेलमध्ये शिवसेनेकडून वर्धापन दिनाचं सेलिब्रेशन करण्यात येणार आहे.


ट्वीट करत शिवसेना कार्यकर्त्यांना शुभेच्छा


पक्षनिष्ठा आणि आपुलकीने पक्षाला भक्कम करणाऱ्या तमाम निष्ठावंत शिवसैनिकांना ५६ व्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा, अशा शब्दात शिवसैनिकांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.





 
 
यावर्षीही शिवसेनेचा वर्धापन दिन ऑनलाईन  
यावर्षीही शिवसेनेचा वर्धापन दिन ऑनलाईन साजरा होणार आहे. सध्या विधानपरिषद निवडणुकीमुळे सर्व आमदार आणि महत्वाचे पदाधिकारी एकाच हॉटेलमध्ये आहेत. त्यात कोरोना डोकं वर काढत असल्यामुळे हा मेळावा ऑनलाईन होणार आहे. राज्यसभेनंतर होणाऱ्या विधान परिषद आणि महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हा मेळावा महत्वाचा मानला जात आहे.  मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्ते आणि जनतेला काय संबोधित करणार याकडे सर्वाचं लक्ष आहे. 


विधान परिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा चारही पक्षांनी आपआपल्या आमदारांची मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच सगळे पक्ष खबरदारी घेत आहेत. शिवसेनेचे आमदार  हॉटेल वेस्ट इनमध्ये मुक्कामाला आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.