Shiv Sena Uddhav Thackeray Address Live Update : दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ अशी मिंधे गटाची अवस्था : उद्धव ठाकरे

Shivsena Gatpramukh Melava : शिंदे गटाने केलेल्या बंडानंतर आज पहिल्यांदाच शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यातील प्रत्येक अपडेट्स आपल्याला एका क्लिकवर वाचायला मिळतील

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Sep 2022 08:28 PM
Uddhav Thackeray : व्हर्च्युअल क्लासरुम ही संकल्पना 15 वर्षापूर्वी पहिली मुंबईत शिवसेनेनी आणली : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Live :  गटप्रमुख हे माझे वैभव आहे.  मुख्यमंत्रीपद जाऊनही इतकी गर्दी येते, हे वैभव आहे. त्यामुळे शिवसेना जे बोलते ते करते आणि जे केलंय तेच तुम्हांला घरोघरी जाऊन सांगायचे आहे. शाळांमध्ये अमुलाग्र बदल केले, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या केल्या. व्हर्च्युअल क्लासरुम ही संकल्पना पहिली मुंबईत सुरू केली.  आपली पंचाईत ही होते की आपण जे करतो त्याची जाहिरात करत नाही. 

Uddhav Thackeray On Vedanta : दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ अशी मिंधे गटाची अवस्था : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray On Vedanta :  मुंबई हे देशाच आर्थिक केंद्र आणि आणि तेथून तुम्ही आर्थिक केंद्रच पळवता? वेदांतावरून धादांत खोट बोलता? कुणाशी भांडताय? आम्हीं येऊ तुमच्यासोबत, आणतो म्हणा, परत आणा. मिंधे गट म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा, अशी टीका वेदांता प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली आहे 

Uddhav Thackeray : मला माझ्या घराण्याचा अभिमान : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील घडामोडी तुम्हांला माहित हव्यात. जनसंघ हा समिती फोडणारा, ही त्यांचीच औलाद आहे. पंचवीस वर्ष युतीत आमची सडली, कुजली. ही सगळी नालायक माणसं आपण जोपासली. विनासायास यांना उपमहापौर पद मिळालं... मेहनत करायची शिवसैनिकांनी.  वंशवाद म्हणजे काय? मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे... तुमचा वंश कुठला? सगळे बाहेरचे घेतले भरले आहेत... वंशवाद म्हणजे काय? मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. तुमचा वंश कुठला? असा सवाल उद्धव ठाकरेंनी या वेळी उपस्थित केला आहे.

Uddhav Thackeray On Mumbai : आईवर चाल करून येणार्‍याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray On Mumbai :  मुंबई संकटात असते तेव्हा कुठे असता? जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तुम्ही येता. ही तुमच्यासाठी रिअल इस्टेटमधील पर स्क्वेअर फीटप्रमाणे विकायची जमीन आहे, आमच्यासाठी ही मातृभूमी आहे, आमची आई आहे. या आईवर चाल करून येणार्‍याचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही : उद्धव ठाकरे

 Uddhav Thackeray on Amit Shah : मुंबईवर लचके तोडणारी गिधाड, त्यांची औलाद फिरायला लागली : उद्धव ठाकरे

 Uddhav Thackeray on Amit Shah : मुंबईवर लचके तोडणारी गिधाड, त्यांची औलाद फिरायला लागली आहे. शिवाजी महाराजांच्या काळात देखील आदिल शहा, हे शहा, ते शहा असे अनेक चाल करून आलेले... आताही त्या कुळातील येऊन गेले. अमित शाह म्हणाले, शिवसेनेला जमीनीवर आणू. तुम्हीं प्रयत्न कराच, तुम्हांला आम्हीं आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Live Update : मुलं पळवणारी टोळी पाहिली पण बाप पळवणारी औलाद राज्यात :  उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Live Update :  आज एवढी गर्दी तर दसऱ्याला किती गर्दी  किती असणार आहे. संजय राऊत म्हणजे मोडेन पण वाकणार नाही. मुले पळवणारी टोळी पाहिली पण बाप पळवणारी औलाद पहिल्यांदाच राज्यात पाहिली :  उद्धव ठाकरे

Shivsena Gatpramukh Melava : उद्धव ठाकरे सभागृहाच्या दिशेने रवाना

Shivsena Gatpramukh Melava : उद्धव ठाकरे सभागृहाच्या दिशेने रवाना झाले आहेत. 

Shivsena Anant Geete : सगळे निर्णय पक्षप्रमुख शिवसैनिकांच्या संमतीनेच घेतात : अनंत गिते

Shivsena Anant Geete : शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे मेळावा होतो. आजचा मेळावा मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर आहे. तसेच, "व्यासपीठावर संजय राऊत यांची खुर्ची लावली असेल तर त्यात काही वेगळं नाही."असे विधान शिवसेना नेते अनंत गिते यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. तसेच तेजस ठाकरे यांच्या संदर्भात "हा जर आणि तर चा विषय आहे. पण सगळे निर्णय हे पक्षप्रमुख शिवसैनिकांच्या संमतीने घेतात". असेही गिते यावेळी म्हणाले.


 

Shivsena Sanjay Raut : मेळाव्याच्या व्यासपीठावर संजय राऊत यांच्यासाठी खुर्ची आरक्षित

आज होणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये व्यासपीठावर संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची आरक्षित ठेवण्यात आली आहे. या कृतीमुळे संजय राऊत यांच्या पाठीशी आपण आहोत असा संदेश दिला जात आहे.  संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली असून ते सध्या तुरुंगात आहेत. 

Shivsena : शिवसैनिकांचे जथ्थेच्या जथ्थे गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये दाखल

Shivsena : महिला आणि पुरुष शिवसैनिकांचे जथ्थेच्या जथ्थे गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये दाखल होत आहेत. शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. महिला भगव्या साड्या परिधान करून आल्या आहेत. या दरम्यान अनेक प्रकारच्या घोषणाबाजीही सुरु आहेत. तसेच, एक शिवसैनिक थेट बोरीवलीहून सायकलवर आला आहे. भगव्या रंगांची सायकल, भगवा झेंडा, छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो सायकलवर लावले आहेत. 

Shivsena : दसरा मेळाव्याची जी परंपरा आहे. तिच कायम राहील : नीलम गोऱ्हे

Shivsena : दसरा मेळाव्याची जी परंपरा आहे. तिच कायम राहील. शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा महापालिकेवर पाहायला मिळणार आहे. हा पहिला गटप्रमुखांचा मेळावा नाही याआधी देखील 2007 साली मेळावा घेतला होता आणि त्यानंतर महापालिका निवडणुकीत आम्हाला भरघोस यश मिळालं होतं. असे विधान शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. 


 

Shivsena : बुथ जिंका, मुंबई जिंका, शिवसेनेची नवी घोषणा

मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्याला आलेल्या गटप्रमुखांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेतले जात आहे. तसंच 'बुथ जिंका, मुंबई जिंका,' अस कानमंत्रही यावेळी गटप्रमुखांना दिला जात आहे.

Shivsena : दसरा मेळावा आमचा नैतिक हक्क : अरविंद सावंत

Shivsena : 'ही रंगीत तालीम नव्हे. हा मेळावा पूर्वनियोजित होता. गटप्रमुख ही आमची ताकद आहे. तसेच दसरा मेळावा आमचा नैतिक हक्क आहे" असं वक्तव्य शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केलं आहे. गोरेगाव येथे आयोजित नेस्को सेंटरमध्ये ते बोलत होते.   


 

Shivsena : नेस्को सेंटरमध्ये गटप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित

Shivsena : मुंबईतील शाखांमधून शिवसैनिकांच्या गाड्या गोरेगाव नेस्कोसाठी निघाल्या आहेत. नेस्को सेंटरच्या गेटवर माजी मंत्री अनिल परब, आमदार सुनील प्रभू, अनिल देसाई दाखल झाले आहेत. शिवसेनेच्या गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये गटप्रमुख मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होत आहेत. 


 

Shivsena : नेस्को ग्राऊंडमध्ये सुमारे 22 हजार खुर्च्यांची व्यवस्था

22 हजार खुर्च्या या गटप्रमुखांच्या मेळाव्यासाठी नेस्को ग्राऊंडमध्ये लावण्यात आलेल्या आहेत. सुमारे 400 बसेस याठिकाणी येणार आहेत. मुंबईत जवळपास 227 शिवसेनेच्या शाखा असल्याने मोठ्या प्रमाणात गटप्रमुख, कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

Shivsena : पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्रक भरून घेण्यासाठी चार टेबल सज्ज

राज्यात शिंदे आणि ठाकरे गट निर्माण झाल्यानंतर जास्तीत जास्त शिवसैनिक आपल्याकडेच आहेत याचा पुरावा म्हणून उद्धव ठाकरे यांना आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मागच्या काही दिवसांमध्ये राज्यभरातल्या ठिकठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची प्रतिज्ञापत्रं मातोश्रीवर पोहोचवली आहेत. मात्र अजूनही काही पदाधिकारी बाकी असण्याची शक्यता लक्षात घेऊन आज या मेळाव्याच्या निमित्ताने जे प्रतिज्ञापत्र भरणे बाकी आहेत, त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येणार आहेत. यासाठी चार टेबल तयार करण्यात आले असून स्वयंसेवकांची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे.

पार्श्वभूमी

Shiv Sena Uddhav Thackeray Address Live Update : मुंबई महापालिका निवडणूक आणि शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज मुंबईतील शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा घेणार आहेत.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आजच्या भाषणांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या गटप्रमुखांच्या मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना (Shivsena) मुंबई महापालिका निवडणुकीचे (BMC Election) शिवसेना रणशिंग फुंकणार आहे. दसरा मेळाव्याआधी होणाऱ्या मेळाव्याला विशेष महत्त्व आले आहे. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात आज संध्याकाळी 7 वाजता हा मेळावा होणार आहे. 


आतापर्यंत शिवसेनेचं राजकारण हे बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व आणि मराठी माणूस यांच्या भोवती फिरत आलेलं आहे. बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना भाजपनं फोडल्याचा वारंवार आरोप होत आहे. अगोदर  पक्ष फोडला, मग चिन्हासाठी धडपड आणि आता दसरा मेळाव्यासाठी असलेल्या शिवतीर्थासाठी भांडण या मुद्दयांवरून उद्धव ठाकरे आपल्या शिवसैनिकांना भावनिक साद घालू शकतात.  


गणेशोत्सवाच्या निमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी भाजप नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत शाहांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे हे अमित शाह यांच्या भाषणाचा समाचार घेऊ शकतात. मागील काही महिन्यांत शिंदे गटाच्या आमदारांनी मातोश्रीविरोधात केलेल्या व्यक्तव्यांचा समाचार उद्धव ठाकरे घेण्याची शक्यता आहे. 


केंद्रीय यंत्रणांचा राज्यात होत असलेला वापर, मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचारावरून मातोश्रीवर होत असलेल्या आरोपांवरून मागील काही दिवसांत मोठं राजकारण घडलं होतं यावर देखील विरोधकांना ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे. 


शिवाजी पार्कच्या मैदानात दसरा मेळाव्यासाठी अद्याप पालिकेकडून कोणालाच परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच, शिवाजी पार्कचं मैदान दसरा मेळाव्यासाठी कोणालाही मिळणार नाही, अशी चर्चा सुरु झाल्या असून यासंदर्भातील महापालिकेचा विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय एबीपी माझाच्या हाती लागला आहे. अशातच शिवसेनेनं मात्र यासर्व घडामोडींवर आक्रमक पवित्रा घेत थेट मैदानात उतरुन दसरा मेळावा घेण्याची तयारी दर्शवली आहे. तशी तयारीही शिवसेनेकडून सुरु झाल्याची चर्चा आहे. गद्दारांना क्षमा नाही...!, अशा आशयाचे बॅनर शिवसेनेकडून झळकवण्यात आले असून दसरा मेळाव्याच्या बॅनरवरील तेजस ठाकरेंच्या फोटोमुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणं आलं आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं ठाकरे परिवार आपला हुकमी एक्का बाहेर काढणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.