Shiv Sena MP Meeting : मातोश्री (Matoshree) बंगल्यावर शिवसेना खासदारांची दोन तासांपासून बैठक सुरु आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या 18 लोकसभा खासदारांपैकी सहा खासदारांनी या बैठकीला दांडी मारली आहे. काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. तर राज्यसभेचे संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी हे दोन खासदार बैठकीला उपस्थित असून अनिल देसाई दिल्लीत आहेत. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी साडेबारा वाजता या बैठकीला सुरुवात झाली आहे. बैठकीला तीन तास उलटून गेले तरीही केवळ लोकसभेचे 12 खासदारच बैठकीला हजर आहेत. 

गैरहजर खासदार शिंदे गटात?दरम्यान 12 खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून सातत्याने केला जात होता. त्यामुळे आजच्या बैठकीसाठी अनुपस्थित असलेले खासदार शिंदे गटात गेले असं म्हणायचं का अशी चर्चा सुरु आहे. काही कारणास्तव खासदार येऊ शकले नाहीत. परंतु काहींनी आतापासूनच इंटरनेट बंद करायला सुरुवात केली आहे असंही म्हटलं जात आहे.

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याबाबत खलबतंराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील उमेदवारांना पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत उद्धव ठाकरे आणि खासदारांमध्ये चर्चा सुरु आहे. भाजपच्या उमेदवाराला कोणत्या आधारावर पाठिंबा द्यायचा आणि यूपीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा नाही तर त्याचं कारण द्यावं लागेल. त्यामुळे शिवसेना राष्ट्रपतीपदासाठी यूपीए की एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे बैठकीअंती स्पष्ट होईल. तत्पूर्वी खासदार राहुल शेवाळे आणि राजेंद्र गावित यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे.  

उपस्थित खासदार1. गजानन कीर्तिकर2. अरविंद सावंत3. विनायक राऊत4. हेमंत गोडसे5. धैर्यशील माने6. प्रताप जाधव7. सदाशिव लोखंडे8. राहुल शेवाळे9. श्रीरंग बारणे 10. राजन विचारे11. ओमराजे निंबाळकर 12. राजेंद्र गावित 

शिवसेनेचे अनुपस्थित खासदार1. यवतमाळ-वाशिम - भावना गवळी2. परभणी - संजय जाधव3. कोल्हापूर - संजय मंडलिक4. हिंगोली - हेमंत पाटील5. कल्याण-डोंबिवली - श्रीकांत शिंदे6. रामटेक - कृपाल तुमाने7. दादरा-नगर हवेली - कलाबेन डेलकर

राज्यसभा खासदार उपस्थित1. संजय राऊत 2. प्रियांका चतुर्वेदी

अनिल देसाई (दिल्लीला आहेत)

Shivsena MP Meeting : शिवसेना खासदारांची मातोश्रीवर बैठक, कोण उपस्थित - कोण अनुपस्थित

संबंधित बातमी

उद्धव ठाकरेंची उरलेल्या 15 आमदारांना भावनिक साद; पत्र लिहित म्हणाले, आईच्या दुधाशी बेईमानी...