मुंबई : बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर ठाकरे - शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले आणि एकच राडा सुरु झाला. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली. मी उद्याही जाऊन दर्शन घेऊ शकलो असतो, पण स्मृतिदिनाला गालबोट लागू नये म्हणून आम्ही पूर्वसंध्येला जाऊन दर्शन घेतलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या  स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं. त्यानंतर तिथे शिंदे गटाचे काही कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचवेळी शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे आमने सामने आले. 

Continues below advertisement

ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं.  या राड्यानंतर दादरच्या शिवाजी पार्क परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. त्यामुळे मोठा फौजफाटा शिवाजी पार्क परिसरात तैनात करण्यात आला होता. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला. 

स्मृतिदिनाला गालबोल लागू नये हीच इच्छा - मुख्यमंत्री शिंदे

'ही घटना अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आहे. दरवर्षी अगदी शांतेत आणि व्यवस्थित बाळासाहेबांचा स्मृतिदिन साजरा होतो. महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते स्मृतिस्थळाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला उद्या वाद नको होता. या दिवसाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागावं अशी आमची इच्छा नव्हती. म्हणूनच आम्ही आज जाऊन स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं. माझ्यासोबत खासदार, आमदार आणि पदाधिकारी होते. आम्ही शांततेत दर्शन घेतलं. पण तिथे येऊन जाणीवपूर्वक घोषणाबाजी करणं, महिलांना धक्काबुक्की करणं ही बाब अत्यंत निंदनीय आहे', असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

Continues below advertisement

नेमकं काय घडलं? 

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्मृतीस्थळावरून निघून गेल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि अनिल देसाई दाखल झाले. त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी शिंदे गटाविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतक म्हात्रे यांनी केला. ठाकरे गटाने घोषणाबाजी, धक्काबुक्कीला सुरुवात केली असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले.

हेही वाचा : 

Shiv Sena Clash : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर शिंदे-ठाकरेंचे कार्यकर्ते भिडले, दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी