Prakash Surve on Marathi: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पेटला असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी आता मनसेसह शिवसेना ठाकरे गटाला सुद्धा आयत कोलित दिलं आहे. प्रकाश सुर्वे यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना मराठी माझी आई आहे, तर उत्तर भारत माझी मावशी आहे. आई मेली तरी चालेल, मात्र मावशी मरायला नाही पाहिजे, अशी मुक्ताफळे उधळली आहेत. त्यामु ळे एक प्रकारे मराठी विरुद्ध अमराठी वादामध्ये प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या वक्तव्यावरून वादंग निर्माण होण्याची चिन्ह आहेत. 

Continues below advertisement

मराठी माणसाने हा आमदार निवडून दिला आहे का? (MNS on Prakash Surve)

दरम्यान, प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ मनसे नेते नयन कदम यांच्याकडून ट्विट करण्यात आला आहे. त्यांनी नयन कदम यांच्या मराठी मेली चालेल मुद्यावरून जोरदार प्रहार केला आहे. नयन कदम यांनी ट्विट करत म्हटलं आहे की,  मागाठाणेच्या मराठी माणसाने हा आमदार निवडून दिला आहे का? "मराठी मेली तरी चालेल" स्वतःच्या आईला मारून यूपी ची मावशी जगवतो हा, याचा जाहीर निषेध.

गेल्या काही दिवसांपासून मराठीचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये चांगला तापला आहे. हिंदी सक्तीचा वरवंटा महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ठाकरे बंधूंसह महाराष्ट्रातील मराठीजन रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे सरकारला एक पाऊल मागे जात हा निर्णय जवळपास गुंडाळून टाकावा लागला. दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा मराठीचा मुद्दा चांगला तापण्याची चिन्हे आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या वक्तव्याने शिंदे गटाची अडचण वाढवणारी आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या