मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा सध्या पोर्नोग्राफी केसमध्ये तुंरुगात आहेत. पोर्नोग्राफी प्रकरणी क्राईम ब्रान्चने काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिची चौकशी केली होती. या चौकशीत शर्लिनने अनेक खुलासे केले होते. शर्लिन चोप्राने राज कुंद्रांवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला होता. मात्र तिने राज कुंद्रासोबतच्या फोटोसह आज केलेलं ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे. 

शर्लिनने शेअर केलेल्या ट्वीटनंतर सर्वच चकीत झाले आहेत. ट्वीट केलेल्या या फोटोमध्ये ती राज कुंद्रा देखील दिसत आहेत. हा फोटो द शर्लिन चोप्रा अॅप कॉन्टेन्ट शूटच्या वेळचा असल्याचं शर्लिनने म्हटलं आहे. 

राजु कुंद्रांसोबतचा फोटो शेअर करताना शर्लिन चोप्राने लिहिले की, 29 मार्च 2019 चा हा दिवस होता. आर्म्सप्राईम आयोजित 'द शर्लिन चोप्रा' अॅपचे पहिले कंटेंट शूट होणार होते. माझ्यासाठी हा एक नवीन अनुभव होता कारण मी यापूर्वी कोणत्याही अॅपशी संबंधित काम केले नव्हते. आशा आणि उत्साहाचे वातावरण होते.

राज कुंद्रांवर अनेक अभिनेत्रींचा आरोप

राज कुंद्रांना 14 दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच 28 जुलै रोजी न्यायालयानं त्यांचा जामीन अर्जही फेटाळून लावला होता. राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक अभिनेत्रींकडून त्याच्यावर आरोप करण्यात आले आहेत. राज कुंद्रावर पॉर्न व्हिडीओ शूट करुन हॉटशॉटवर पब्लिश केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्या अटकेनंतर अनेक अभिनेत्रींनी राज कुंद्राच्या या अॅपबाबत उघडपणे भाष्य केलं आहे. शर्लिन चोप्रानेही राज कुंद्रावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला होता. 

इतर बातम्या

Raj Kundra Case : राज कुंद्रानं जबरदस्ती केली, बाथरुममध्ये पळ काढत बचाव केला; शर्लिन चोप्राचा गंभीर आरोप

Raj Kundra Case : राज कुंद्रा आपले बोल्ड व्हिडीओ शिल्पा शेट्टीला दाखवायचा; शर्लिन चोप्राचा आरोप