मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी सध्या गजाआड आहे. अटक होण्यापूर्वी असलेला इंद्राणीचा लूक आणि सध्याची तिची चेहरेपट्टी यात जमिन आस्मानाचा फरक आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

 

इंद्राणी मुखर्जी...

 
शीना बोरा हत्याकांडातील आरोपी ड्रायव्हर शाम रायने माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा असल्याचं पत्र गेल्या आठवड्यात कोर्टाला लिहिलं होतं. त्यानंतर त्याची साक्ष नोंदवली गेली. त्यामुळे याप्रकरणात आरोपी इंद्राणीसह, पीटर मुखर्जी यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

 
2012 साली अलिबागच्या जंगल परिसरात शीना बोराचा मृतदेह सापडला होता. मात्र, मृतदेह कुजून गेल्यानं त्याची ओळख पटवण्यात बराच वेळ गेला. अखेर दोन वर्षानंतर तो मृतदेह शीना बोराचा असल्याचं उघड झालं आणि धक्कादायक म्हणजे याप्रकरणी शीनाची आई इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी मुख्य आरोपी म्हणून समोर आले.