मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काल (मंगळवार) संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहावर शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये ही बैठक पार पडली.
जवळपास तासभर चाललेल्या या बैठकीत नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली? हे अद्याप कळू शकलेलं नाही. त्यामुळं अनेक चर्चांना उधाण आलं आहे. ही बैठक पूर्वनियोजीत होती की शरद पवारांनी अचानक मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
दरम्यान, कालच मुख्यमंत्री कार्यालयानं कॅगच्या अहवालानंतर लवासाचा विशेष नियोजन प्राधिकरण दर्जा रद्द केला होता. त्यामुळे या बैठकीत याबाबत काही चर्चा झाली का? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.