डोंबिवली : सहामाही परीक्षेत काही विषयात कमी गुण मिळाले म्हणून निराश होऊन सातवीतल्या मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. या घटनेनं डोंबिवलीत हळहळ व्यक्त होत आहे.
११ वर्षीय मुलगी डोंबिवली पूर्वमधील एका शाळेत शिकत होती. दिवाळीच्या सुट्टीनंतर कालच तिची शाळा सुरू झाली. यावेळी सहामाही परीक्षेचा निकालही जाहीर झाला. या निकालात तिला काही विषयात कमी गुण मिळाले. त्यामुळे ती फारच निराश झाली.
याच नैराश्येपोटी तिनं संध्याकाळी साडेसातच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
सहामाही परीक्षेत कमी मार्क मिळाल्यानं सातवीतील मुलीची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Nov 2017 06:12 PM (IST)
सहामाही परीक्षेत काही विषयात कमी गुण मिळाले म्हणून निराश होऊन सातवीतल्या मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -