मुंबई : राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळाला लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर करण्याच आलं आहे. एसटी महामंडळाने नुकतीच याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संप, कामबंद आंदोलनावर निर्बंध येणार आहेत.
एसटीची सेवा लोकोपयोगी सेवा जाहीर केल्याबाबतची माहिती एसटीच्या विविध बावीस संघटनांना देखील एसटी महामंडळाने दिली आहे.
एसटी महामंडळाची सेवा 12 ऑक्टोबर 2018 पासून पुढील सहा महिन्यांसाठी लोकोपयोगी सेवा म्हणून जाहीर करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटीला लोकोपयोगी सेवा जाहीर केल्यानं आता एसटीची सेवा बाधित होणार नाही ,एसटीच्या सेवेवर परिणाम होणार नाही. याकडे गांभीर्याने पाहण्याची जबाबदारी एसटी प्रशासनाची असणार आहे.
एसटीच्या लोकोपयोगी सेवेत समावेश केल्यानं एसटी कर्मचाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांसाठी संप, कामबंद आंदोलन यावर आता निर्बंध येणार आहेत. याबाबत एसटीच्या विविध संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.