कल्याण : मध्य रेल्वेवरील कल्याण रेल्वे स्थानक हे मुंबईतील सगळ्यात जीवघेणं स्थानक ठरलं आहे. मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांमध्ये चालू वर्षात कल्याण रेल्वे स्थानकात सर्वाधिक बळी गेले आहेत.


कल्याण रेल्वे स्थानकात जानेवारी 2018 पासून आजवर तब्बल 301 जणांचा बळी गेला आहे. यापैकी सर्वाधिक 151 बळी हे रेल्वे रूळ ओलांडताना गेले आहेत. त्यानंतर रेल्वेतून पडून 51 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींचा आकडाही बराच मोठा आहे. मात्र असं असूनही कल्याणचे रेल्वे प्रवासी मात्र बेजबाबदारपणे रूळ ओलांडताना दिसतात.


मुंबईत पाच वर्षात रेल्वे रुळांवर 18,423 जणांचा मृत्यू


मुंबईत रेल्वे रुळांवर 2013 ते 2018 या पाच वर्षात एकूण 18 हजार 423 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 18 हजार 847 लोक जखमी झाले आहेत, माहिती अधिकारातून ही माहिती समेर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई रेल्वे पोलिसांकडे 2013 पासून मुंबई उपनगरीय रेल्वेगाड्यातून पडून किंवा रेल्वे रुळ क्रॉस करताना किती लोकांचा मृत्यू किंवा जखमी झाले? याची माहिती मागितली होती. त्यानंतर मुंबई रेल्वे पोलिसांच्या जनमाहिती अधिकाऱ्यांनी ही माहिती पुरवली आहे.


संबंधित बातम्या


मुंबईत पाच वर्षांत रेल्वे रुळांवर 18423 जणांचा मृत्यू