मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या रजिस्ट्रार कार्यालयातील सर्व्हर कालपासून (शुक्रवार) बंद आहे. यामुळं राज्यभरातील सह निबंधक कार्यालये काल बंद होती. तर आज आणि उद्या (शनिवार आणि रविवार) या कार्यालयांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे नागरिकांचा मोठा खोळंबा होण्याची शक्यता आहे.


काल अनेक जिल्ह्यातल्या सहनिबंधक कार्यालयात नागरिकांच्या मोठ्याच मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. पण सर्व्हरच बंद झाल्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप करावा लागत आहे. खरं तर आज सर्व्हर सुरळीत होणं अपेक्षित होतं, पण अजूनही सर्व्हर डाऊनच असल्याचं कळतं आहे.

आज आणि उद्या रजिस्ट्रार ऑफिस बंद असल्यानं अनेकांना मालमत्तांचे व्यवहार करण्यासाठी आता थेट सोमवारची वाट पाहावी लागणार आहे.