गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापेक्षा यंदाच्या वर्षातलं हे सर्वाधिक तापमान होतं. काल मुंबईचं तापमान नेहमीपेक्षा 5 अंशांनी जास्त होतं. हा पारा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
वातावरणातील आर्द्रता कुलाबा भागात 87 टक्के तर सांताक्रूझ भागात 75 टक्के होती.
तर हवामान विभागाच्यामते मान्सूनमुळे सध्या वातावरणात आर्द्रता आधीच अस्तित्वात आहे, आणि त्यात हवेतला कोरडेपणा आणि आर्द्रता यामुळे मुंबईत ऑक्टोबर हिट सारखी परिस्थिती निर्माण होत आहे.
परतीचा पाऊस बरसणार?
दरम्यान, सध्या मुंबईत तापत असली, तरी येत्या काही दिवसात परतीचा पाऊस जोरदार बरसण्याचा अंदाज आहे. 15 ते 25 सप्टेंबरदरम्यान मोठा पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे. येत्या 24 तासात विदर्भातील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसंच कोकण-गोव्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदोर पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.