मुंबई: मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं प्रथमच 32 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी शेअर मार्केट सुरु होताच सेन्सेक्सनं 200 अंकांची उसळी घेतली. या उसळीसह इतिहास रचत शेअर बाजारानं 32 हजारांचा टप्पा ओलांडला. तर निफ्टीमध्येही 50 अंकाची उसळी पाहायला मिळाली.


रिझर्व्ह बँकेकडून व्याज दरात कपात होण्याचा अंदाज असल्यानं शेअर बाजारात तेजी निर्माण झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.



यासोबतच बुधवारी महागाईचा दरदेखील जाहीर झाला. महागाईत घट झाल्याचा चांगला परिणाम शेअर बाजारावर होताना पाहायला मिळतो आहे. जूनमधील महागाईचा दर १.५४ टक्के इतका होता.