एवढचं नाही तर, महिला छेड़छाड़ पथक, मंगळसूत्र चोरीविरोध पथक याचबरोबर नुकतंच मुंबई पोलीस दलात सहभागी झालेले 200 महिला बीट मार्शलही गणोशोत्स्व काळात मुंबईत तैनात करण्यात आलं आहे.
मोठा बंदोबस्त
आयसीसचा धोका आणि मुंबईतील गणेशोत्वाची धामधूम लक्षात घेवून मुंबई पोलीसांनी यंदा मोठ्या बंदोबस्ताची तयारी करत, मुंबईला बंदोबस्त म्हणून छावणीचं स्वरुप देण्यात आलं आहे.
यासाठी 4 सहपोलीस आयुक्त, 11 अप्पर पोलीस आयुक्त, 33 पोलीस उपायुक्त, 6 कंपनी राज्य राखीव दल आणि पॅरामिलेक्टरी फोर्स, 3200 ट्रेनी पोलीस, 1000 होमगार्डचे जवान, नागरी संरक्षण दलाचे 500 कर्मचारी आणि 150 प्रोबेश्नरी पोलीस उपनिरीक्षक, आपत्ती व्यवस्थापनाचे 6000 स्वयंसेवक, नागरी सरंक्षण दलाचे 1500 जवान, एनएसएसचे 900 विद्यार्थी, स्काऊट गाईडचे 300 विद्यार्थी, 390 वाहतूक रक्षक, रस्ता सुरक्षा दलाचे 100 शिक्षक, राष्ट्रीय छात्रसेनेचे 400 विद्यार्थी, 3 हजार 536 वाहतूक पोलीस, सशस्त्र दलाचे 100 जवान आणि हॅम रेडीओचे 35 स्वयंमसेवक असा भरक्कम पोलीस आणि एनजीओंचा मोठा बंदोबस्त मुंबईत गणेशोत्स्व काळात असेल.
गणपती आगमन अणि विसर्जन काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि मुंबईकरांना त्रास होऊ नये याकरता मुंबई ट्रॅफिक पोलीसांनीही आपला अक्शन प्लान तयार करण्यात आला आहे.
मुंबईत असे अनेक गणपती मंडळ आहेत. ज्या ठिकाणी गर्दीच्या फायदा घेऊन समाजकंटकांनी घातपात घडवू नये, याकरता साध्या वेशातील पोलीस तैनात करणार आहेतच शिवाय अशा मंडळांना सीसीटिव्ही कॅमेरा लावण्याचे आदेश देण्यात आलेत. आणि जास्तीत जास्त स्वयंमसेवी संस्थांची मदत घेण्याच आवाहन मुंबई पोलीसांनी केली आहे.