Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) दुसऱ्या टप्प्याचे मतदान आज पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, केरळसह 13 राज्यातील 88 जागांसाठी मतदान होत आहे. काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन (EVM Machine) बंद पडले असून मतदानासाठी अडथळा निर्माण झाला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप केला आहे. 


संजय राऊत म्हणाले की, ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदारांचा खोळंबा होतोय. काही मतदार कंटाळून मतदानाकडे पाठ फिरवताय. मतदारांना पाठ फिरवायला लावणं हा भाजपच्या षड्यंत्राचा भाग अस शकतो, असा आरोप त्यांनी केला आहे. 


हे मोदीकृत भाजपाचे षड्यंत्र


बंद पडलेल्या ईव्हीएम मशीन संध्याकाळनंतर सुरु होतात. त्यानंतर ज्यांना हवे आहे त्या लोकांच्या झुंडी तिथे उभ्या राहतात. सकाळी येणाऱ्या मतदारांना निराश करणे हे या निवडणुकीच्या यंत्रणेतील मोदीकृत भाजपाचे षड्यंत्र असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. 


मोदींचा वचननामा म्हणजे फेक नामा


बेरोजगारांना रोजगार देणे. गुजरातमधील पळवलेले उद्योग परत आणणे. महिला सबलीकरण, शिक्षण, आरोग्य, दहशतवादावरती उपायोजना अशा अनेक भूमिका ज्या वचनाम्यात घेतलेल्या आहेत, त्याला विरोध आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. मोदींचा (PM Narendra Modi) वचननामा म्हणजे फेक नामा आहे. आम्ही प्रथमच काँग्रेस (Congress), शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि राष्ट्रवादी शरद पवार गट (NCP Sharad Pawar Faction) एकत्र येऊन काही गोष्टी जाहीर केल्या आहे. यामुळे त्यांना पोटदुखी होत आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. 


महाविकास आघाडी 35 पेक्षा जास्त जागा जिंकणार


तीन जागांवर उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेृत्वाखालील शिवसेना आणि चोरलेली शिवसेना असा सामना आहे. या जागा आम्ही जिंकणार आहोत. 8 जागांवर भाजप (BJP) आणि सहकाऱ्यांना महविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांसमोर संघर्ष करावा लागतोय. आधीच्या विदर्भातील निवडणुका आणि आजच्या यात महविकस आघाडीच जिंकेल. आम्ही 35 पेक्षा जास्त जागा जिंकत आहोत. आज मतदान होत असलेल्या 8 जागांवर महाविकास आघाडीच जिंकत असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 


आणखी वाचा 


Hingoli Lok Sabha: हिंगोलीत पहिल्या दोन तासांमध्ये मतदानात एक ना अनेक अडथळे, 39 बॅलेट मशीन तर 16 कंट्रोल युनिट बदलले