नोटाबंदीच्या निर्णयानंतरची अंमलबजावणी अत्यंत ढिसाळ आहे. काही निर्णय गोपनीय असतात. नोटाबंदीचा निर्णय मंत्र्यांनाही माहित नव्हता. मात्र, नोटाबंदी निर्णयाआधी तयारी करणं आवश्यक होतं, असे म्हणत संजय राऊत यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली.
"नोटाबंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीतील ढिसाळपणावरच शिवसेनेने बोट ठेवलं. सत्तेत असूनही आम्ही ते करतो, त्याबद्दल अभिनंदन करा", असे सांगायलाही संजय राऊत विसरले नाहीत.
नोटाबंदीवरुन संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. "पैसे काढण्यासाठी मी स्वत: रांगेत उभा होतो. उद्योगपती, सीईओ रांगेत उभे आहेत का? अभिनेते, निर्माते रांगेत आहेत का? परदेशातील काळा पैसा बाहेर आणणे आवश्यक होते." असे राऊत म्हणाले.
विशेष म्हणजे मनमोहन सिंह यांच्यावर कायम टीका करणाऱ्या संजय राऊत यांनी नोटाबंदीवरील मनमोहन सिंह यांच्या भाषणाची गंभीर दखल घेण्याचा सल्ला दिला. "डॉ. मनमोहन सिंह कमी बोलतात, पण ते बोलतात ते योग्य असतं. त्यांचं ऐकायला हवं.", असे राऊत म्हणाले. यावेळी, मुंबईतील्या 15 ते 20 लाख नोकऱ्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे जातील, असं भाकितही राऊत यांनी वर्तवलं.
वाजपेयींचं सरकार हे एनडीएचं सरकार होतं. तर हे भाजपचं सरकार आहे, असे म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. शिवाय, भाजपला वाईट काळात शिवसेनेने साथ दिल्याची आठवणही त्यांनी करुन दिली.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत प्रश्न विचारल्यावर, मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल आणि मुंबईचा पुढचा महापौर शिवसेनेचाच असेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
'माझा कट्टा'वरील महत्त्वाचे मुद्दे –
- मनसे नावाचा पक्ष आहे हे विसरूनच गेलो होतो - संजय राऊत
- शिवसेना आणि सामना वेगळा नाही - संजय राऊत
- नोटाबंदीच्या निर्णयानंतरची अंमलबजावणी अत्यंत ढिसाळ, त्यावरच शिवसेनेने बोट ठेवलं, सत्तेत असून
- आम्ही ते करतो, त्याबद्दल अभिनंदन करा - संजय राऊत
- काही निर्णय गोपनिय असतात, नोटाबंदीचा निर्णय मंत्र्यांनाही माहित नव्हता - संजय राऊत
- नोटाबंदी निर्णयाआधी तयारी करणं आवश्यक होतं - संजय राऊत
- उत्तर प्रदेशचा निकाल ठरवेल, कोणाचे पैसे लपवले - संजय राऊत
- मी स्वत: रांगेत उभे होते - संजय राऊत
- उद्योगपती, सीईओ रांगेत उभे आहेत का? अभिनेते, निर्माते रांगेत आहेत का? - संजय राऊत
- परदेशातील काळा पैसा बाहेर आणणे आवश्यक होते - संजय राऊत
- मनमोहन कमी बोलतात, पण जे बोलतात ते योग्य - संजय राऊत
- मनमोहन सिंहांचं ऐकायला हवं, ते अर्थतज्ज्ञ आहेत - संजय राऊत
- मोदी बाळासाहेबांबत जे म्हणाले, त्याचं चुकीचं वार्तांकन झालं - संजय राऊत
- युतीबाबत मी बाळासाहेबांना काय उत्तर देऊ, असं त्यांचं म्हणणं होतं - संजय राऊत
- निवडणूक प्रक्रिया ही काळ्या पैशाची गंगोत्री - संजय राऊत
- हे निजामाच्या बापाच्या सरकार, हे आम्ही बोललो - संजय राऊत
- वाजपेयींचं सरकार हे एनडीएचं होतं, हे बीजेपीचं राज्य आहे - संजय राऊत
- मुंबई पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणारच - संजय राऊत
- भाजपचा वाईट काळ होता, तेव्हा शिवसेनेने साथ दिली - संजय राऊत
- मुंबईचा पुढचा महापौर शिवसेनेचाच - संजय राऊत
- आयुक्त मुख्यमंत्र्यांचे दूत, त्यांना जास्त अधिकार - संजय राऊत